Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 1:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्यांचे पाय ताठ उभे होते आणि त्यांच्या पायांचे तळवे वासराच्या पायांच्या तळव्यांसारखे असून उजळ पितळेसारखे झळकत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्यांचे पाय सरळ होते पण तळवे वासरांच्या तळव्यासारखे आणि पितळेसारखे चकाकणारे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्यांचे पाय सरळ होते; त्यांच्या पायाचे तळवे वासराच्या तळव्यांसारखे असून ते उजळत्या कास्यासारखे चमकत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 1:7
7 Iomraidhean Croise  

वायूंना आपले दूत करतोस, अग्नी व ज्वाला ह्यांना आपले सेवक करतोस.


त्या प्राण्यांचे रूप म्हटले तर अग्नीच्या इंगळासारखे, मशालीसारखे दिसत होते. अग्नी त्या प्राण्यांमधून खेळत होता; तो धगधगीत असून त्यातून विद्युल्लता निघत होती.


त्याने मला त्या जागी नेले तेव्हा एक पुरुष दिसला; त्याचे स्वरूप पितळेसारखे होते; त्याच्या हातात तागाची एक दोरी व मापण्याची काठी होती; तो वेशीनजीक उभा होता.


त्याचे शरीर वैडूर्यमण्यासारखे असून त्याचे मुख विद्युल्लतेसारखे होते. त्याचे नेत्र पेटलेल्या दीपांसमान होते, त्याचे हातपाय उज्ज्वल पितळेसारखे होते आणि त्याच्या शब्दाचा ध्वनी एखाद्या समुदायाच्या गजबजाटासारखा होता.


पशूंपैकी ज्यांचे खूर विभागलेले किंवा दुभंगलेले आहेत, व जे रवंथ करतात ते सर्व तुम्ही खावेत;


अशुद्ध व शुद्ध, भक्ष्य प्राणी व अभक्ष्य प्राणी हा भेद ओळखण्याचा हा नियम होय.”


‘त्याचे पाय’ जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत ‘सोनपितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan