Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 1:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 खास्द्यांच्या देशात खबार नदीच्या तीरी बूजीचा पुत्र यहेज्केल याजक ह्याला परमेश्वराचे वचन स्पष्टपणे प्राप्त झाले; तेथे परमेश्वराचा वरदहस्त त्याच्यावर आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 खबार नदिच्या जवळ, खास्द्यांच्या देशात बूजीचा मुलगा यहेज्केल याजकाकडे परमेश्वर देवाचे वचन सामर्थ्याने आले व परमेश्वर देवाचा हात त्याच्यावर आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 बूजीचा पुत्र यहेज्केल याजक बाबिलोनी लोकांच्या देशात, खेबर नदीच्या किनाऱ्याकडे असताना याहवेहचे वचन त्याच्याकडे आले; तिथे याहवेहचा हात त्याच्यावर होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 1:3
23 Iomraidhean Croise  

परमेश्वराचा वरदहस्त एलीयावर असल्यामुळे तो आपली कंबर बांधून अहाबापुढे इज्रेलाच्या वेशीपर्यंत धावत गेला.


आता एखादा वाजंत्री घेऊन या.” वाजंत्री वाद्य वाजवत असताना परमेश्वराचा हस्त अलीशावर आला.


बाबेलच्या नद्यांजवळ आम्ही बसलो; हो, तेथे आम्हांला सीयोनेची आठवण झाली; तेव्हा आम्ही रडलो.


यहूदाचा राजा आमोनपुत्र योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षी परमेश्वराचे वचन यिर्मयाकडे आले.


परमेश्वराचे वचन मला आले ते असे :


तुम्ही म्हणता की, ‘परमेश्वराने बाबेलात आमच्यासाठी संदेष्टे उत्पन्न केले;’


मी खबार नदीच्या तीरी पकडून आणलेल्या लोकांत राहत होतो, तेव्हा तिसाव्या वर्षाच्या चौथ्या मासी पंचमीस असे झाले की आकाश दुभागून मला दिव्य दृष्टान्त दिसले.


ते करूब उडून वर गेले; मी खबार नदीच्या तीरी पाहिला तो हा प्राणी होय.


मी त्याच्यावर आपले जाळे टाकीन म्हणजे तो माझ्या पाशात सापडेल; मी त्याला बाबेलास खास्द्यांच्या देशात घेऊन जाईन; पण तो देश त्याला दिसणार नाही व तो तेथेच मरेल.


मग आत्म्याने मला उचलून धरले, मी आपल्या मनाच्या संतापाने क्लेश पावलो, तेव्हा परमेश्वराचा वरदहस्त जोराने माझ्यावर आला.


त्यानंतर धरून नेलेले लोक राहत असत तेथे त्यांच्याकडे खबार नदीच्या तीरी तेल-अबीब ह्या ठिकाणी मी आलो आणि ते बसले होते तेथे मी बसलो; भयचकित होऊन सात दिवस त्यांच्यामध्ये मी बसून राहिलो.


तेव्हा तेथे परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला व तो मला म्हणाला, “ऊठ, खोर्‍यात जा; तेथे मी तुझ्याबरोबर बोलेन.”


मग मी उठून खोर्‍यात गेलो तेव्हा खबार नदीजवळ मी पाहिले होते तसे परमेश्वराचे तेज तेथेही माझ्यासमोर उभे होते; तेव्हा मी उपडा पडलो.


तो पळून आलेला मनुष्य येऊन पोहचला त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला होता; तो मनुष्य सकाळी माझ्याकडे येण्यापूर्वी देवाने माझे तोंड उघडले होते; माझे तोंड उघडल्यावर मी काही मुका नव्हतो.


परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला; आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोर्‍यात नेऊन ठेवले, तेथे अस्थीच अस्थी होत्या.


आमच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षी, म्हणजे नगराचा विध्वंस झाल्यावर चौदाव्या वर्षी, वर्षारंभाच्या महिन्याच्या दशमीसच परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला व त्याने मला तेथे नेले.


मी नगराचा नाश करण्यास आलो होतो तेव्हाच्या दृष्टान्ता-सारखा दृष्टान्त मी पाहिला; खबार नदीतीरी जो दृष्टान्त मी पाहिला तसे दृष्टान्त माझ्या दृष्टीस पडले; तेव्हा मी उपडा पडलो.


सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पंचमीस असे झाले की मी आपल्या घरी बसलो होतो व यहूदाचे वडील माझ्यासमोर बसले होते. तेव्हा तेथे प्रभू परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला.


पहिल्या महिन्याच्या चोविसाव्या तारखेस महानदी हिद्दकेल (टायग्रीस) हिच्या तीरी मी असता


यहूदाचे राजे उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया, आणि इस्राएली राजा योवाशाचा पुत्र यराबाम ह्यांच्या कारकिर्दीत बैरीचा पुत्र होशेय ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :


पथूएलाचा पुत्र योएल ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :


आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील;


कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan