Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 1:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ती चाके व त्यांचा घाट ही वैडूर्य मण्यांसारखी दिसत होती; त्या चोहोंचा आकार एकच होता; त्यांचा आकार व घाट जणू काय चाकांत चाक असा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 त्या चाकांचे स्वरूप असे दिसत होतेः चारही चाके एक समान व वैडूर्य मण्यांसारखी होती; आणि जणूकाही चाकात चाक घातलेले असून त्यांना एकमेकांस छेदलेले असावे असा त्यांचा आकार होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 त्या चाकांचे रूप व घडण अशाप्रकारे होते: ते पुष्कराजसारखे चमकत होते आणि चारही चाके सारखीच दिसत होती. ते असे दिसत होते की जसे एका चाकात दुसरे चाक आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 1:16
11 Iomraidhean Croise  

चक्राची घडण रथचक्रासारखी होती; त्यांच्या धुर्‍या, पुठ्ठे, आरे आणि तुंबे हे सर्व ओतीव होते.


तो अतर्क्य महत्कृत्ये, अगणित अद्भुत कृत्ये करतो.


तुझे नीतिमत्त्व महान1 पर्वतांसारखे आहे; तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत; हे परमेश्वरा, तू मनुष्य व पशू ह्यांचा प्रतिपाळ करतोस.


हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू आमच्यासाठी केलेली अद्भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत; तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करता येणार नाही;1 मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहेत.


आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे; ही रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणांत जडवली.


त्याचे हात पुष्परागाने खचलेल्या सुवर्णनलिकाच होत; त्याचे पोट नीलमणी जडलेल्या हस्तिदंतफलकासारखे आहे.


त्याचे शरीर वैडूर्यमण्यासारखे असून त्याचे मुख विद्युल्लतेसारखे होते. त्याचे नेत्र पेटलेल्या दीपांसमान होते, त्याचे हातपाय उज्ज्वल पितळेसारखे होते आणि त्याच्या शब्दाचा ध्वनी एखाद्या समुदायाच्या गजबजाटासारखा होता.


मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरुष आसनारुढ झाला; त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता, त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते; त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते; व त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती.


अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!


ह्यासाठी की, जो युगादिकालाचा संकल्प त्याने ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी ह्यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan