Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहेज्केल 1:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्या चौघांच्या मुखांपैकी एक मुख मनुष्याचे होते, त्या चौघांचे उजव्या बाजूचे एक मुख सिंहाचे होते; त्या चौघांचे डाव्या बाजूचे एक मुख बैलाचे होते; आणि त्या चौघांचे एक मुख गरुडाचेही होते, अशी त्यांची मुखे होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्या चौघांच्या मुखापैकी एकाचे मुख मनुष्याच्या तोंडासारखे दिसत होते, दुसऱ्याचे मुख सिंहाच्या तोंडासारखे, तिसऱ्याचे मुख बैलासारखे आणि चौथ्याचे मुख गरुडाच्या तोंडासारखे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 त्यांची मुखे अशा प्रकारे दिसत होती: प्रत्येकाला एक मानवी मुख होते, प्रत्येकाच्या उजव्या बाजूचे मुख सिंहाचे होते, आणि डावीकडील मुख बैलाचे होते; प्रत्येकाला गरुडाचे मुख सुद्धा होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहेज्केल 1:10
20 Iomraidhean Croise  

दावीद अरण्यातील गढीत राहत असे तेव्हा गादी लोकांतले शूर वीर, युद्धकलेत प्रवीण, ढाल व बरची धारण करणारे, सिंहासारख्या मुखाचे आणि पहाडातील हरिणांच्या वेगाने धावणारे असे आपल्या वंशातून वेगळे होऊन दाविदाकडे आले ते हे :


गरुड तुझ्या आज्ञेने भरारी मारतो व उंच ठिकाणी घरटे करतो काय?


बैल नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने धनसमृद्धी होते.


तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.


अहो फितुरी लोकांनो, हे लक्षात आणून दृढ व्हा; हे ध्यानात वागवा.


त्या प्रत्येकाला चार मुखे होती, व प्रत्येकाला चार पंख होते.


त्या प्रत्येकाला चार मुखे होती; पहिले मुख करूबाच्या मुखासारखे होते, दुसरे मनुष्याच्या मुखासारखे होते, तिसरे सिंहाच्या मुखासारखे होते व चौथे गरुडाच्या मुखासारखे होते.


करूबाला एक खजुरीच्या झाडाकडे मनुष्याचे मुख व दुसर्‍या खजुरीच्या झाडाकडे तरुण सिंहाचे मुख होते; मंदिरावर चोहोकडे अशा प्रकारचे काम होते.


पहिले सिंहासारखे असून त्याला गरुडाचे पंख होते; मी पाहत असता त्याचे पंख उपटून त्याला जमिनीवरून उचलण्यात आले; त्याला मानवाप्रमाणे दोन पायांवर उभे केले; त्याला मानवाचे हृदय दिले.


दक्षिण बाजूस रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण लावावे; ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलांप्रमाणे राहावे; रऊबेन वंशाचा सरदार शदेयुराचा मुलगा अलीसूर असावा.


पश्‍चिम बाजूस एफ्राईम वंशाच्या छावणीचे निशाण लावावे; ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलांप्रमाणे राहावे; एफ्राईम वंशाचा सरदार अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा हा असावा;


उत्तर बाजूस दान वंशाच्या छावणीचे निशाण लावावे; ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलाप्रमाणे राहावे; दान वंशाचा सरदार अम्मीशादैचा मुलगा अहीयेजर हा असावा.


पूर्वेस उगवतीकडे ज्यांनी आपापल्या दलांप्रमाणे डेरे ठोकायचे ते यहूदाच्या छावणीतील निशाणाचे लोक असावेत; यहूदा वंशाचा सरदार अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन असावा;


त्याप्रमाणे, पश्‍चात्ताप करणार्‍या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हांला सांगतो.”


बंधुजनहो, बालबुद्धीचे होऊ नका; पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा.


दुरून, पृथ्वीच्या सीमेवरून गरुडाप्रमाणे झेप घेणारे राष्ट्र परमेश्वर तुझ्यावर आणील; त्याची भाषा तुला समजणार नाही;


‘पहिला प्राणी सिंहा’सारखा, ‘दुसरा गोर्‍ह्या’सारखा, ‘तिसरा माणसाच्या तोंडा’सारखा व ‘चौथा प्राणी उडत्या गरुडा’सारखा होता.


तेव्हा वडीलमंडळापैकी एक जण मला म्हणाला, “रडू नकोस; पाहा, ‘यहूदा’ वंशाचा ‘सिंह’, दाविदाचा ‘अंकुर’ ह्याने जय मिळवला; म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे.”


सातव्या दिवशी तो शय्यागृहात शिरण्यापूर्वी नगरवासी त्याला म्हणाले, “मधापेक्षा गोड ते काय? आणि सिंहापेक्षा उग्र ते काय?” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्या कालवडीला नांगरास जुंपले नसते तर तुम्हांला माझे कोडे कधीच उलगडले नसते.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan