Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 9:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 दुसर्‍या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसर देशातील सर्व जनावरे मेली; तथापि इस्राएल लोकांच्या जनावरांपैकी एकही मेले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 दुसऱ्या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसरमधील सर्व गुरे मरण पावली. परंतु इस्राएल लोकांच्या गुरांपैकी एकही मरण पावले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 आणि दुसर्‍या दिवशी याहवेहने तसेच केले: इजिप्त लोकांची सर्व गुरे मरून गेली, परंतु इस्राएल लोकांच्या कळपातील एकही जनावर मेले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 9:6
10 Iomraidhean Croise  

त्याने त्यांची गुरेढोरे गारांच्या, व जनावरे विजांच्या हवाली केली.


त्याने आपल्या कोपासाठी मार्ग सिद्ध केला; त्याने त्यांचा जीव मृत्यूपासून वाचवला नाही, तर त्यांचा प्राण मरीच्या हवाली केला.


कारण ह्या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशू ह्या सर्वांचे प्रथमजन्मलेले मी मारून टाकीन आणि मिसर देशातील सर्व देवांचे शासन करीन; मी परमेश्वर आहे.


मध्यरात्री असे झाले की मिसर देशातील सिंहासनावर बसणार्‍या फारोच्या ज्येष्ठ मुलापासून तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ मुलापर्यंत सर्व, आणि गुराढोरांपैकी सर्व प्रथमवत्स परमेश्वराने मारून टाकले.


तथापि गोशेन प्रांतात माझे लोक राहत आहेत, तो मी त्या दिवशी अलग ठेवीन; गोमाश्यांचे थवे तेथे जाणार नाहीत, ह्यावरून पृथ्वीवर मी परमेश्वर आहे हे तुला कळेल.


सर्व मिसर देशात माणसे, गुरेढोरे, वगैरे जे काही वनात होते त्या सर्वांवर गारांचा मारा झाला; शेतातील सर्व वनस्पतींवर मारा झाला आणि वनातील सर्व वृक्ष मोडून गेले.


मात्र गोशेन प्रांतात इस्राएल लोक राहत होते तेथे मुळीच गारा पडल्या नाहीत.


इस्राएलाची गुरेढोरे आणि मिसर्‍यांची गुरेढोरे ह्यांच्यामध्ये परमेश्वर भेद राखील; इस्राएल लोकांचे एकही जनावर मरायचे नाही.”’


मग परमेश्वराने वेळ ठरवली आणि म्हटले, “उद्या परमेश्वर ह्या देशात ही गोष्ट करील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan