Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 9:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 मोशे त्याला म्हणाला, “मी नगराबाहेर गेलो की परमेश्वराकडे आपले हात पसरीन तेव्हा मेघगर्जना बंद होईल व गारा पडायच्या नाहीत; ह्यावरून तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 मोशेने फारोला सांगितले, “जेव्हा मी हे शहर सोडून जाईन तेव्हा माझे हात पसरून मी परमेश्वरापुढे विनंती करीन आणि मग ही मेघगर्जना व हा गारांचा मारा थांबेल; तेव्हा तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 मोशे म्हणाला, “शहराबाहेर जाताच प्रार्थनेत याहवेहकडे मी माझे हात पसरेन. मग गडगडाट थांबेल व गारांचा वर्षावही होणार नाही. यावरून तुला कळेल की, पृथ्वी याहवेहची आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 9:29
19 Iomraidhean Croise  

शलमोनाने इस्राएलाच्या सर्व मंडळीदेखत परमेश्वराच्या वेदीसमोर उभे राहून आकाशाकडे हात पसरले;


आणि इस्राएलातील एखादा माणूस किंवा तुझे सगळे इस्राएल लोक आपल्या जिवाला होणारा क्लेश ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी ह्या मंदिराकडे आपले हात पसरून करतील,


उपोषण केलेला, वस्त्र व झगा फाडलेला, अशा स्थितीत मी संध्याकाळच्या अर्पणसमयी उठलो आणि गुडघे टेकून माझा देव परमेश्वर ह्याच्यापुढे आपले हात पसरून म्हणालो,


आपले हृदय नीट करशील, देवाकडे आपले हात पसरशील,


परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात व पृथ्वीवर, समुद्रात व सर्व जलाशयांत करतो.


मी आपले हात तुझ्यापुढे पसरतो; शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे. (सेला)


मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाही, कारण जग व जगातले सर्वकाही माझे आहे.


म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे;


कारण सहा दिवसांत परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्वकाही निर्माण केले आणि सातव्या दिवशी विसावा घेतला; म्हणून परमेश्वराने शब्बाथ दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला.


तथापि गोशेन प्रांतात माझे लोक राहत आहेत, तो मी त्या दिवशी अलग ठेवीन; गोमाश्यांचे थवे तेथे जाणार नाहीत, ह्यावरून पृथ्वीवर मी परमेश्वर आहे हे तुला कळेल.


अहरोनाने मिसरातील जलाशयांवर आपला हात उगारला तेव्हा बेडूक बाहेर निघाले, आणि त्यांनी मिसर देश व्यापून टाकला.


मोशे फारोजवळून निघून नगराबाहेर गेला आणि परमेश्वराकडे त्याने आपले हात पसरले तेव्हा मेघगर्जना व गारा बंद झाल्या व पृथ्वीवर पाऊस पडायचा थांबला.


तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकतो; तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्ताने भरले आहेत.


कारण “पृथ्वी व तिच्यावर जे काही भरले आहे ते परमेश्वराचे आहे.”


परंतु कोणी तुम्हांला सांगितले की, “हा मूर्तीचा नैवेद्य आहे,” तर ज्याने हे सुचवले त्याच्याखातर व सदसद्विवेक-बुद्धीखातर खाऊ नका. [कारण पृथ्वी व तिच्यावरील परिपूर्णता प्रभूची आहे.]


पाहा, आकाश व आकाशापलीकडचे आकाश आणि पृथ्वी व तिच्यातले सर्वकाही तुझा देव परमेश्वर ह्याचे आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan