Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 9:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 ह्याप्रमाणे गारा पडत असता मधूनमधून अग्नीचा लोळ दिसत होता; ही गारांची वृष्टी एवढी भारी होती की मिसरी राष्ट्राची स्थापना झाल्यापासून त्यात कोठेही तशी वृष्टी कधी झाली नव्हती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 गारांचा मारा व त्यासोबत विजांच्या अग्नीचा लोळ जमिनीवर आला. मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून गारांचे असे भयंकर व वाईट वादळ मिसरावर कधी आले नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 गारा पडून चहूकडे विजा लखलखत होत्या, इजिप्त देशाची स्थापना झाली तेव्हापासून कधी झाले नाही असे भयंकर वादळ उठले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 9:24
11 Iomraidhean Croise  

ती मी संकटसमयासाठी, लढाई व युद्ध ह्यांच्या प्रसंगासाठी राखून ठेवली आहेत.


त्याने पावसाऐवजी त्यांच्यावर गारा पाडल्या; त्यांच्या देशावर अग्नीचे लोळ पाठवले.


परमेश्वराने आकाशात गर्जना केली, परात्पराची वाणी झाली, गारा व धगधगीत इंगळ बाहेर पडले.


तुझी घरे, तुझ्या सर्व सेवकांची घरे आणि सर्व मिसरी लोकांची घरे ते व्यापून टाकतील, इतके टोळ तुझ्या बापदादांनी किंवा त्यांच्या वाडवडिलांनी त्यांच्या जन्मात आणि आजवरदेखील पाहिले नसतील.”’ मग मोशे मागे फिरून फारोपुढून निघून गेला.


पाहा, उद्या ह्या वेळेस मी गारांची अशी भयंकर वृष्टी करीन की मिसरी राष्ट्राची स्थापना झाल्यापासून आजवर तशी वृष्टी झाली नाही.


मोशेने आपली काठी आकाशाकडे उगारली तेव्हा परमेश्वराने मेघगर्जना व गारांची वृष्टी केली, आणि अग्नीचा लोळ जमिनीकडे येऊ लागला; ह्या प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर गारांचा वर्षाव केला.


सर्व मिसर देशात माणसे, गुरेढोरे, वगैरे जे काही वनात होते त्या सर्वांवर गारांचा मारा झाला; शेतातील सर्व वनस्पतींवर मारा झाला आणि वनातील सर्व वृक्ष मोडून गेले.


तेव्हा परमेश्वर आपला प्रतापी शब्द कानी पाडील, आणि आपल्या क्रोधाचे फुरफुरणे, भस्म करणार्‍या अग्नीची ज्वाला, मेघांचा गडगडाट आणि पर्जन्य व गारा ह्यांची वृष्टी ह्यांनी आपले भुजबल दाखवील.


मी पाहिले तो उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तेव्हा एक विशाल मेघ येत असून त्यामध्ये लपेटलेला एक अग्निगोल होता; त्याभोवती प्रभा फाकली असून अग्नीच्या मध्यभागातून तृणमण्याच्यासारखे तेज झळकत होते.


ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो : आपल्या संतापामुळे तुफानी वारा सुटेल असे मी करीन; माझ्या कोपामुळे जोराचा पाऊस पडेल, नाश होण्यासाठी माझ्या संतापामुळे मोठ्या गारा पडतील.


कारण ‘जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट’ त्या काळी येईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan