Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 9:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 मोशेने आपली काठी आकाशाकडे उगारली तेव्हा परमेश्वराने मेघगर्जना व गारांची वृष्टी केली, आणि अग्नीचा लोळ जमिनीकडे येऊ लागला; ह्या प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर गारांचा वर्षाव केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तेव्हा मोशेने आपली काठी आकाशाकडे उगारली आणि मग परमेश्वराने मेघगर्जना, लखलखणाऱ्या विजा व गारा यांचा पृथ्वीवर वर्षाव केला. अशा प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर भडीमार केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 जेव्हा मोशेने आपली काठी आकाशाकडे लांब केली, तेव्हा याहवेहने ढगांच्या गडगडाटांसह गारा पाठविल्या व विजा भूमीवर पडल्या. अशाप्रकारे याहवेहने इजिप्तवर गारांची वृष्टी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 9:23
22 Iomraidhean Croise  

तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांच्यावर गंधक व अग्नी ह्यांचा वर्षाव आकाशातून केला;


शिक्षेसाठी असो, त्याच्या ह्या पृथ्वीच्या हितासाठी असो, किंवा दया करण्यासाठी असो, तो त्यांना पाठवतो.


तो आपल्या बर्फाचा चुर्‍याप्रमाणे वर्षाव करतो. त्याच्या गारठ्यापुढे कोण टिकेल?


अग्नी, गारा, हिम व धुके, त्याची आज्ञा सिद्धीस नेणारे वादळ,


परमेश्वराने आकाशात गर्जना केली, परात्पराची वाणी झाली, गारा व धगधगीत इंगळ बाहेर पडले.


परमेश्वराचा ध्वनी जलांमधून चढत आहे; प्रतापशाली देव गर्जना करीत आहे; परमेश्वर जलाशयांवर आहे.


तुझ्या गर्जनेचा शब्द झंझावातात होता; विजांचा पृथ्वीवर लखलखाट झाला; भूमी कंपित होऊन डळमळली.


तिसरा दिवस उजाडताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग जमले व शिंगांचा फार मोठ्याने नाद होऊ लागला, तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले.


मेघगर्जना होत आहे, विजा चमकत आहेत, कर्ण्याचा नाद होत आहे आणि पर्वतातून धूर चढत आहे असे सर्व लोकांच्या दृष्टीस पडले तेव्हा त्यांचा थरकाप झाला व ते दूर उभे राहिले,


पाहा, उद्या ह्या वेळेस मी गारांची अशी भयंकर वृष्टी करीन की मिसरी राष्ट्राची स्थापना झाल्यापासून आजवर तशी वृष्टी झाली नाही.


ह्याप्रमाणे गारा पडत असता मधूनमधून अग्नीचा लोळ दिसत होता; ही गारांची वृष्टी एवढी भारी होती की मिसरी राष्ट्राची स्थापना झाल्यापासून त्यात कोठेही तशी वृष्टी कधी झाली नव्हती.


तेव्हा परमेश्वर आपला प्रतापी शब्द कानी पाडील, आणि आपल्या क्रोधाचे फुरफुरणे, भस्म करणार्‍या अग्नीची ज्वाला, मेघांचा गडगडाट आणि पर्जन्य व गारा ह्यांची वृष्टी ह्यांनी आपले भुजबल दाखवील.


मरी व रक्तपात ह्यांनी मी त्याच्याबरोबर वाद मांडीन; त्याच्यावर, त्याच्या सैन्यावर पाऊस, मोठ्या गारा, अग्नी व गंधक ह्यांची धो-धो वृष्टी मी त्याच्याबरोबर असलेल्या अनेक लोकसमूहांवर करीन.


ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर केलेल्या मोठाल्या गारांच्या वर्षावामुळे ते ठार झाले; इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांनी मेले.


तेव्हा ‘विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट’ झाले. शिवाय इतका मोठा भूमिकंप झाला की ‘पृथ्वीवर’ मानव ‘झाल्यापासून’ इतका मोठा भूमिकंप ‘कधी झाला नव्हता.’


सुमारे एक मण वजनाच्या ‘मोठ्या गारा’ आकाशातून माणसांवर पडल्या; तेव्हा गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली; कारण त्या गारांची पीडा ‘अतिभयंकर’ होती.


पहिल्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा ‘रक्तमिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर’ वृष्टी झाली; आणि पृथ्वीचा तिसरा भाग जळून गेला; एक तृतीयांश झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan