Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 9:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 आणि ज्याने परमेश्वराच्या सांगण्याची पर्वा केली नाही त्याने आपले दास आणि जनावरे रानात राहू दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 परंतु इतर सेवकांनी परमेश्वराच्या संदेशाकडे दुर्लक्ष केले व रानांतील त्यांचे सर्व दास व गुरेढोरे, रानात राहू दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 पण ज्यांनी याहवेहच्या शब्दाकडे दुर्लक्ष केले, त्यांनी आपले दास व पशू यांना रानातच सोडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 9:21
11 Iomraidhean Croise  

तर आता तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला जिवेभावे शरण जा. उठा, परमेश्वर देवाचे पवित्रस्थान बांधायला लागा; परमेश्वराच्या नामाप्रीत्यर्थ जे मंदिर बांधायचे आहे त्यात परमेश्वराच्या कराराचा कोश व देवाची पवित्र पात्रे ठेवायची आहेत.”


त्याचे चित्त स्वतःकडेच असले, त्याने आपला आत्मा व श्वास आवरून स्वत:च्या ठायी परत घेतला,


मानव तो काय की तू त्याला थोर मानावे, आपले चित्त त्याच्यावर ठेवावे,


फारो मागे फिरून घरी निघून गेला; त्याने हेसुद्धा लक्षात घेतले नाही.


फारोच्या सेवकांपैकी ज्याला परमेश्वराच्या सांगण्याची भीती वाटली त्याने आपले दास व जनावरे पळवत घरी आणली.


मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू आपला हात आकाशाकडे उगार म्हणजे सर्व मिसर देशावर गारांची वृष्टी होईल; मिसर देशातील माणसांवर, गुरांवर व शेतातील प्रत्येक वनस्पतीवर ती होईल.”


चतुर मनुष्य अरिष्ट येताना पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानी पावतात.


ते मी पाहिले, त्याचा विचार केला, आणि ते पाहून मी बोध घेतला.


तो पुरुष मला म्हणाला, “मानवपुत्रा, आपल्या डोळ्यांनी पाहा, आपल्या कानांनी ऐक, व मी तुला जे काही दाखवतो त्या सर्वांकडे चित्त लाव; हे तुला दाखवावे म्हणून मी तुला इकडे आणले आहे; तू जे पाहशील ते सर्व इस्राएल घराण्यास सांग.”


तो मला म्हणाला, “दानिएला, भिऊ नकोस; कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा, व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्‍चय केलास त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले; त्या तुझ्या शब्दांवरून मी आलो आहे.


तिचा प्राण जातेसमयी ज्या स्त्रिया तिच्या भोवती उभ्या होत्या त्या तिला म्हणाल्या, “भिऊ नकोस, तुला पुत्र झाला आहे.” पण ती काहीएक बोलली नाही व त्यांच्या बोलण्याकडे तिने लक्षही दिले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan