Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 9:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 नाहीतर ह्या खेपेस मी सर्व प्रकारच्या पीडा तुझ्या हृदयावर, तुझ्या सेवकांवर व तुझ्या प्रजेवर पाठवतो, म्हणजे अखिल पृथ्वीवर माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे तुला त्यावरून कळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 कारण या वेळेस मी आपल्या सर्व पीडा तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर व तुझ्या लोकांवर पाठवीन म्हणजे सर्व पृथ्वीवर माझ्यासारखा कोणी देव नाही, हे यावरुन तुला कळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 नाहीतर यावेळी मी तुम्हा सर्वांवर म्हणजेच तू व तुझे अधिकारी व तुझे लोक या सर्वांवर भयानक पीडा पाठवेन, ज्यामुळे तुझी खात्री होईल की, सर्व पृथ्वीवर माझ्यासारखा इतर कोणी नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 9:14
27 Iomraidhean Croise  

ह्यास्तव हे प्रभू परमेश्वरा, तू थोर आहेस; जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही; तुझ्याशिवाय अन्य देव नाही.


आणि इस्राएलातील एखादा माणूस किंवा तुझे सगळे इस्राएल लोक आपल्या जिवाला होणारा क्लेश ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी ह्या मंदिराकडे आपले हात पसरून करतील,


हे परमेश्वरा, जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे त्या सर्वांवरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही; तुझ्याशिवाय अन्य देव नाही.


हे प्रभू, देवांमध्ये तुझ्यासमान कोणी नाही, आणि तुझ्या कृत्यांसारखी कोणतीही कृत्ये नाहीत.


हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे?


तो म्हणाला, “उद्या.” तेव्हा मोशेने म्हटले, “तुझ्या सांगण्याप्रमाणे होईल, मग तुला कळेल की, आमचा देव परमेश्वर ह्याच्यासारखा दुसरा कोणी नाही.


अहरोनाने मिसरातील जलाशयांवर आपला हात उगारला तेव्हा बेडूक बाहेर निघाले, आणि त्यांनी मिसर देश व्यापून टाकला.


कारण आतापर्यंत मी आपला हात उगारून तुझ्यावर व तुझ्या प्रजेवर मरीचा प्रहार केला असता आणि पृथ्वीवरून तुझा उच्छेद झाला असता;


मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे, माझ्यावेगळा देव नाही; तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला सज्ज केले,


प्राचीन काळापासून घडलेल्या गत गोष्टी स्मरा आणि समजा की, मीच देव आहे, दुसरा कोणी नव्हे, माझ्यासमान कोणीच नाही.


हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणीच नाही; तू थोर आहेस, पराक्रमामुळे तुझे नाम मोठे आहे.


हे राष्ट्रांच्या राजा, तुला कोण भिणार नाही? हे तुला साजते; राष्ट्रांतील सर्व ज्ञात्यांत, त्यांच्या सर्व राज्यांत तुझ्यासमान कोणीच नाही.


मी हे नगर विस्मय व उपहास ह्यांना पात्र करीन; त्यावर झालेल्या सर्व आघातांमुळे त्याच्याजवळून जाणारा-येणारा प्रत्येक जण विस्मित होऊन उपहास करील.


त्याला मनुष्यांतून घालवून देण्यात आले; त्याचे हृदय पशूंसारखे झाले; तो रानगाढवांमध्ये वस्ती करू लागला; तो बैलाप्रमाणे गवत खाई व त्याचे शरीर आकाशातील दहिवराने भिजत असे. मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो त्यावर पाहिजे त्याला स्थापतो, असे ज्ञान त्याला होईपर्यंत तो असा राहिला.


इतके केल्यावरही तुम्ही माझे ऐकले नाही तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हांला सातपट शिक्षा करीन,


तरीही माझ्याविरुद्ध तुम्ही वागलात व माझे ऐकले नाही, तर तुमच्या पापांच्या मानाने तुमच्यावर सातपट अनर्थ आणीन.


तर मी संतापून तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन.


म्हणून मी तुला हाणून भारी जखम करतो, तुझ्या पातकांमुळे मी तुला उजाड करतो.


‘हे प्रभू परमेश्वरा, तू आपल्या दासाला आपला प्रताप व आपला समर्थ हात दाखवू लागला आहेस; तुझ्यासारखी कार्ये करणारा व पराक्रम करणारा देव स्वर्गात किंवा पृथ्वीवर कोण आहे?


परमेश्वरच देव आहे व त्याच्याशिवाय दुसरा नाही असे तुला कळावे म्हणून हे तुला दाखवण्यात आले.


ह्यामुळे तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ ‘एका दिवशीच येतील,’ आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल; कारण तिचा ‘न्यायनिवाडा करणारा प्रभू’ देव ‘सामर्थ्यवान’ आहे.”


ह्या पुस्तकातील ‘संदेशवचने’ ऐकणार्‍या प्रत्येकाला मी निश्‍चयपूर्वक सांगतो की, जो कोणी ‘ह्यांत भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या’ पीडा देव आणील;


हायहाय, आता आमचे काय होईल! अशा प्रतापी देवाच्या हातून आमची सुटका कोण करणार? ज्यांनी रानात मिसरी लोकांना तर्‍हतर्‍हेच्या पीडांनी पिडले तेच हे देव होत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan