Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 8:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 अहरोनाने मिसरातील जलाशयांवर आपला हात उगारला तेव्हा बेडूक बाहेर निघाले, आणि त्यांनी मिसर देश व्यापून टाकला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मग अहरोनाने आपला हात मिसराच्या जलाशयावर लांब केला तेव्हा बेडूक बाहेर आले आणि त्यांनी अवघा मिसर देश व्यापून टाकला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्याप्रमाणे अहरोनाने इजिप्तच्या पाण्यावर आपला हात लांब केला आणि संपूर्ण देश बेडकांनी व्यापून गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 8:6
17 Iomraidhean Croise  

ह्यास्तव हे प्रभू परमेश्वरा, तू थोर आहेस; जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही; तुझ्याशिवाय अन्य देव नाही.


असे म्हणाला, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, आकाशात व पृथ्वीवर तुझ्यासमान कोणी देव नाही; जे तुझे सेवक जिवेभावे तुझ्यासमोर वागतात त्यांच्याशी तू आपल्या कराराप्रमाणे व दयेने वागतोस.


त्यांचा देश, त्यांचे राजवाडे बेडकांनी व्यापून टाकले.


त्याने त्यांच्यावर माश्यांचे थवेच्या थवे पाठवले; त्या माश्यांनी त्यांना ग्रासून टाकले; त्याने बेडूक पाठवले, त्या बेडकांनी त्यांचे सर्वकाही नासून टाकले.


हे प्रभू, देवांमध्ये तुझ्यासमान कोणी नाही, आणि तुझ्या कृत्यांसारखी कोणतीही कृत्ये नाहीत.


पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी, तू पृथ्वी व जग निर्माण केलेस त्यापूर्वीच अनादि कालापासून अनंतकालापर्यंत तू देव आहेस.


मी परमेश्वर आहे हे तुम्हांला कळावे म्हणून मी मिसर्‍यांची कशी फजिती केली आणि त्यांच्यामध्ये काय काय चिन्हे प्रकट केली ते तुझ्या पुत्रपौत्रांच्या कानी जाऊ दे.”


हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे?


मग परमेश्वराने मोशेला म्हटले, “तू अहरोनाला सांग की, ‘आपली काठी घेऊन मिसर देशात जितके पाणी म्हणून आहे म्हणजे त्यातल्या नद्या, नाले, तलाव व हौद ह्या सर्वांवर आपला हात उगार म्हणजे त्या सर्वांच्या पाण्याचे रक्त बनेल; आणि मिसरातील काष्ठपाषाणांच्या सर्व पात्रांत रक्तच रक्त होईल.”’


नाहीतर ह्या खेपेस मी सर्व प्रकारच्या पीडा तुझ्या हृदयावर, तुझ्या सेवकांवर व तुझ्या प्रजेवर पाठवतो, म्हणजे अखिल पृथ्वीवर माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे तुला त्यावरून कळेल.


मोशे त्याला म्हणाला, “मी नगराबाहेर गेलो की परमेश्वराकडे आपले हात पसरीन तेव्हा मेघगर्जना बंद होईल व गारा पडायच्या नाहीत; ह्यावरून तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे.


परमेश्वराचे असे म्हणणे आहे की, “तुम्ही मला ओळखावे, माझ्यावर भाव ठेवावा व मी तोच आहे, माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरही कोणी होणे नाही हे तुम्हांला समजावे म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात, तू माझा निवडलेला सेवक आहेस.


जलाशयांतल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते सर्व ओंगळ समजावेत.


त्यांचा दुर्ग आपल्या दुर्गासारखा नाही, हे आपले शत्रूही जाणून आहेत.


हे यशुरूना, देवासमान कोणी नाही, तो तुझ्या साहाय्यासाठी मेघमंडळावर आरूढ होऊन आपल्या प्रतापाने आकाशमार्गाने धाव घेतो.


परमेश्वरच देव आहे व त्याच्याशिवाय दुसरा नाही असे तुला कळावे म्हणून हे तुला दाखवण्यात आले.


नंतर ‘बेडकासारखे’ असलेले तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, श्वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्याच्या तोंडातून निघताना मी पाहिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan