निर्गम 8:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
3 नील नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल आणि तुझ्या वाड्यात, तुझ्या निजण्याच्या खोलीत, तुझ्या अंथरुणावर, तुझ्या चाकरनोकरांच्या घरांत, तुझ्या लोकांवर, तुझ्या भट्ट्यांत आणि काथवटींत बेडूकच बेडूक होतील;
3 नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल. बेडूक नदीतून तुझ्या वाड्यात झोपण्याच्या खोलीत, अंथरुणात तसेच तुझ्या सेवकांच्या व अधिकाऱ्यांच्या घरात, तुझ्या भट्ट्यात आणि काथवटीत येतील.
3 नाईल नदी बेडकांनी भरून जाईल. ते तुझ्या महालात व तुझ्या शयनगृहात, तुझ्या अंथरुणात येतील, तुझ्या अधिकार्यांच्या घरात आणि तुझ्या लोकांवर, तुझ्या भट्ट्या व तुझ्या परातीत ते येतील.
तरी राजकन्या यहोशबाथ3 हिने अहज्याचा पुत्र योवाश ह्याला त्या वधायच्या राजपुत्रांतून चोरून नेले आणि बिछाने ठेवण्याच्या कोठडीत त्याच्या दाईने त्याला लपवून ठेवले. ह्याप्रमाणे यहोराम राजाची कन्या जी यहोयादा याजकाची पत्नी यहोशबाथ (जी अहज्याची बहीण होती) तिने योवाशाला अथल्येपासून लपवले म्हणून तिला त्याचा वध करता आला नाही.
तुझी घरे, तुझ्या सर्व सेवकांची घरे आणि सर्व मिसरी लोकांची घरे ते व्यापून टाकतील, इतके टोळ तुझ्या बापदादांनी किंवा त्यांच्या वाडवडिलांनी त्यांच्या जन्मात आणि आजवरदेखील पाहिले नसतील.”’ मग मोशे मागे फिरून फारोपुढून निघून गेला.