Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 8:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तो म्हणाला, “उद्या.” तेव्हा मोशेने म्हटले, “तुझ्या सांगण्याप्रमाणे होईल, मग तुला कळेल की, आमचा देव परमेश्वर ह्याच्यासारखा दुसरा कोणी नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 फारोने उत्तर दिले, “उद्या.” तेव्हा मोशे म्हणाला, “तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल अशा प्रकारे तुम्हास समजेल की आमच्या परमेश्वरासारखा कोणीच देव नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 फारोह मोशेला म्हणाला, “उद्या.” मोशेने उत्तर दिले, “तुझ्या सांगण्याप्रमाणे होईल, अशासाठी की तू जाणावे की याहवेह आमचे परमेश्वर यासारखे इतर कोणीही नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 8:10
21 Iomraidhean Croise  

ह्यास्तव हे प्रभू परमेश्वरा, तू थोर आहेस; जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही; तुझ्याशिवाय अन्य देव नाही.


हे परमेश्वरा, जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे त्या सर्वांवरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही; तुझ्याशिवाय अन्य देव नाही.


म्हणजे तू, केवळ तूच, परमेश्वर3 ह्या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळू दे.


हे प्रभू, देवांमध्ये तुझ्यासमान कोणी नाही, आणि तुझ्या कृत्यांसारखी कोणतीही कृत्ये नाहीत.


परमेश्वराने न्यायनिवाडा करून स्वतःला प्रकट केले आहे; दुर्जनास त्याच्याच हातच्या पाशात त्याने गुंतवले आहे. (हिग्गायोन सेला)1


हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे?


मोशे फारोला म्हणाला, “तुझ्यापासून व तुझ्या घरातून बेडूक नाहीसे करून नदीत मात्र राहू द्यावेत म्हणून मी तुझ्यासाठी, तुझ्या सेवकांसाठी आणि तुझ्या प्रजेसाठी केव्हा विनवणी करावी, हे सांगण्याचा मान माझ्याऐवजी तुला असो.”


नाहीतर ह्या खेपेस मी सर्व प्रकारच्या पीडा तुझ्या हृदयावर, तुझ्या सेवकांवर व तुझ्या प्रजेवर पाठवतो, म्हणजे अखिल पृथ्वीवर माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे तुला त्यावरून कळेल.


मोशे त्याला म्हणाला, “मी नगराबाहेर गेलो की परमेश्वराकडे आपले हात पसरीन तेव्हा मेघगर्जना बंद होईल व गारा पडायच्या नाहीत; ह्यावरून तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे.


उद्याची खातरी मानू नकोस, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही.


तुम्ही देवाला कोणती उपमा द्याल? त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल?


मी कोणाशी तुल्य आहे म्हणून त्यांची उपमा मला तुम्ही द्याल असे पवित्र प्रभू म्हणतो.


प्राचीन काळापासून घडलेल्या गत गोष्टी स्मरा आणि समजा की, मीच देव आहे, दुसरा कोणी नव्हे, माझ्यासमान कोणीच नाही.


‘हे प्रभू परमेश्वरा, तू आपल्या दासाला आपला प्रताप व आपला समर्थ हात दाखवू लागला आहेस; तुझ्यासारखी कार्ये करणारा व पराक्रम करणारा देव स्वर्गात किंवा पृथ्वीवर कोण आहे?


त्यांचा दुर्ग आपल्या दुर्गासारखा नाही, हे आपले शत्रूही जाणून आहेत.


हे यशुरूना, देवासमान कोणी नाही, तो तुझ्या साहाय्यासाठी मेघमंडळावर आरूढ होऊन आपल्या प्रतापाने आकाशमार्गाने धाव घेतो.


परमेश्वरच देव आहे व त्याच्याशिवाय दुसरा नाही असे तुला कळावे म्हणून हे तुला दाखवण्यात आले.


म्हणून आज हे समजून घ्या आणि ध्यानात ठेवा की, वर आकाशात व खाली पृथ्वीवर परमेश्वरच देव आहे, दुसरा कोणी नाही.


त्या तुम्हांला उद्याचे समजत नाही; तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan