Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 6:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 आणि जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती त्यात मी तुम्हांला नेईन आणि तो तुम्हांला वतन करून देईन; मी परमेश्वर आहे.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 जो देश मी अब्राहाम, इसहाक व याकोबास देण्याची मी हात वर करून शपथ वाहिली होती त्यामध्ये मी तुम्हास नेईन; व तो मी तुम्हास वतन करून देईन. मी परमेश्वर आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 आणि जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब यांना देण्यास मी हात उंच करून शपथ वाहिली, त्यात मी तुम्हाला आणेन आणि तो तुम्हाला वतन म्हणून देईन. मीच याहवेह आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 6:8
29 Iomraidhean Croise  

पण अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी ह्याच्यासमोर मी बाहू उभारून सांगतो की,


त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, “मिसराच्या1 नदीपासून ते महानदी फरात येथ-पर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो.


त्या देशात उपरा असा राहा; मी तुझ्याबरोबर असेन, आणि तुला आशीर्वादित करीन; कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राहाम ह्याच्याशी वाहिलेली शपथ खरी करीन.


आणि पाहा, परमेश्वर तिच्या वरती उभा राहून त्याला म्हणाला, “मी परमेश्वर तुझा पिता अब्राहाम ह्याचा देव व इसहाकाचा देव आहे; ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन;


जो देश मी अब्राहाम व इसहाक ह्यांना दिला तो तुला देईन आणि तुझ्यामागे तुझ्या संततीलाही तोच देश देईन.”


आणि त्यांची क्षुधा भागवण्यासाठी तू आकाशातून त्यांना अन्न दिले, त्यांची तृषा शमवण्यासाठी खडकातून पाणी काढले आणि त्यांना अशी आज्ञा केली की जो देश तुम्हांला देण्यासाठी मी बाहू उभारून आणभाक केली आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तुम्ही त्यात जा.


कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी आणि यबूसी ह्यांच्या देशात, म्हणजे जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा जो देश तुला देण्यास परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली त्या देशात तुला आणल्यावर ह्या महिन्यात तू हा सण पाळावा.


तुझे दास अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांची आठवण कर; तू त्यांना स्वत:ची शपथ वाहून सांगितले होते की, ‘मी तुमची संतती आकाशातील तार्‍यांसारखी बहुगुणित करीन आणि ज्या देशाविषयी मी तुम्हांला सांगितले तो सगळा तुमच्या संततीला देईन आणि ती त्यांची निरंतरची वतनदार होईल.’


देव मोशेशी बोलला; तो म्हणाला, “मी परमेश्वर आहे.


ज्या कनान देशात ते उपरे होते तो परदेश त्यांना वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे;


म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘मी परमेश्वर आहे; मी तुम्हांला मिसरी लोकांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हांला मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन;


आणखी मी हात उचलून रानात अशी शपथ घेतली की दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत व जो सर्व देशांचा मुकुटमणी आहे असा देश मी त्यांना दिला होता, त्यात मी त्यांना आणणार नाही;


आणखी त्यांची राष्ट्रांमध्ये पांगापांग करीन व त्यांना देशोधडीस लावीन अशी प्रतिज्ञाही मी रानात हात उचलून केली;


मी आपला हात उचलून शपथ करून दिलेल्या देशात त्यांना आणले तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी व प्रत्येक दाट छायेचा वृक्ष पाहून तेथे आपले यज्ञबली अर्पण केले; तेथे संतापवण्याजोगी अर्पणे त्यांनी केली; तेथे त्यांनी सुवासिक धूप जाळला व तेथेच त्यांनी आपली पेयार्पणेही वाहिली.


जो इस्राएल देश मी हात उचलून तुमच्या वडिलांना दिला त्यात मी तुम्हांला आणीन तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, मी आपला हात उचलला आहे; तुझ्याभोवतालची परकी राष्ट्रे खचीत अप्रतिष्ठा पावतील;


ह्या देशाचे तुम्हांला सारखे वाटे मिळून तुम्ही येथील वतन पावाल कारण हा देश तुमच्या वडिलांना देईन अशी मी हात वर करून शपथ घेतली आहे; ह्या प्रकारे हा देश तुमचे वतन होईल.


मोशेने आपला सासरा मिद्यानी रगुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याला म्हटले, “परमेश्वराने आम्हांला देऊ केलेल्या प्रदेशाकडे आम्ही जात आहोत, तर तू आमच्याबरोबर चल म्हणजे आम्ही तुझे कल्याण करू; ‘कारण इस्राएलाचे कल्याण करीन’ असे परमेश्वर बोलला आहे.”


मी ह्या सर्व लोकांचे गर्भधारण केले आहे काय? ह्यांना मी प्रसवलो आहे काय? ‘जो देश ह्यांच्या पूर्वजांना तू शपथपूर्वक देऊ केला आहेस, त्या देशाकडे, तान्ह्या बाळाला सांभाळून नेणार्‍या पालक-पित्याप्रमाणे मी ह्यांना उराशी धरून घेऊन जावे’ असे तू मला कसे सांगतोस?


ज्या देशात तुम्हांला घेऊन जाण्याची मी शपथ वाहिली आहे त्यात जाणारच नाही; पण यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा हे मात्र जातील.


“बालाका, ऊठ, ऐकून घे; सिप्पोरपुत्रा, माझ्याकडे कान दे. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी; तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा; दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय?


मी आपला बाहू आकाशाकडे उभारून म्हणतो, माझ्या सनातन जीविताची शपथ,


कारण तुझा देव परमेश्वर हा दयाळू देव आहे; तो तुला अंतर देणार नाही, तुझा नाश करणार नाही आणि तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरणार नाही.


मग जी जमीन तुम्ही कसली नाही ती मी तुम्हांला दिली; जी नगरे तुम्ही बांधली नाहीत त्यांत तुम्ही राहत आहात आणि जे द्राक्षांचे मळे व जैतुनांचे बाग तुम्ही लावले नाहीत त्यांचे उत्पन्न तुम्ही खात आहात.


आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे ते, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते, आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले’, आणखी अवकाश लागणार नाही;


जो इस्राएलाचे केवळ वैभव आहे, तो खोटे बोलणार नाही; तो पस्तावा करणार नाही, त्याला पस्तावा व्हावा असा तो काही मानव नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan