Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 6:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ज्या कनान देशात ते उपरे होते तो परदेश त्यांना वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 ज्या कनान देशात ते उपरी होते तो परदेश त्यांना वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ज्या कनान देशात ते पूर्वी परदेशी म्हणून राहत होते, तो देश मी त्यांना देईन, असा मी त्यांच्याशी करार स्थापित केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 6:4
21 Iomraidhean Croise  

परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या संतानाला देणार.” परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली.


परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू निश्‍चितपणे समज की जो देश स्वत:चा नाही, अशा देशात तुझे संतान उपरे होऊन राहील व तेथील लोकांचे दास्य करील, आणि ते लोक चारशे वर्षे त्यांना छळतील.


त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, “मिसराच्या1 नदीपासून ते महानदी फरात येथ-पर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो.


तुझ्या घरी जन्मलेल्याची व तू पैसे देऊन विकत घेतलेल्याची सुंता अवश्य व्हावी; म्हणजे ज्या कराराची खूण तुमच्या देहात केलेली आहे तो माझा करार निरंतर राहील.


“पाहा, तुझ्याशी माझा करार हा : तू राष्ट्रसमूहाचा जनक होणार.


“मी तुमच्यामध्ये उपरा व परदेशी आहे; माझ्या मालकीचे कबरस्तान तुमच्यामध्ये असावे म्हणून मला जागा द्या, म्हणजे मी आपल्या मयतास दृष्टिआड करीन.


त्या देशात उपरा असा राहा; मी तुझ्याबरोबर असेन, आणि तुला आशीर्वादित करीन; कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राहाम ह्याच्याशी वाहिलेली शपथ खरी करीन.


मी आकाशातील तार्‍यांइतकी तुझी संतती वाढवीन, हे सर्व देश तुझ्या संततीला देईन, आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील;


आणि पाहा, परमेश्वर तिच्या वरती उभा राहून त्याला म्हणाला, “मी परमेश्वर तुझा पिता अब्राहाम ह्याचा देव व इसहाकाचा देव आहे; ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन;


तो तुला व तुझ्याबरोबर तुझ्या संततीला अब्राहामाला दिलेला आशीर्वाद देवो, म्हणजे देवाने अब्राहामाला दिलेला देश, ज्यात तू हल्ली उपरा आहेस, तो तुझे वतन होईल.


तरी तुझ्याशी मी आपला करार स्थापित करतो, तू आपले मुलगे, आपली स्त्री व आपल्या सुना ह्यांना घेऊन तारवात जा.


माझ्या घराण्याचा देवाशी असा संबंध नाही काय? कारण त्याने माझ्याशी निरंतरचा करार केला आहे; तो सर्व प्रकारे यथास्थित व निश्‍चित आहे; माझा संपूर्ण उद्धार व अभीष्ट ह्यांचा तो उदय होऊ देणार नाही काय?


तो म्हणाला, “कनान देश तुझा वतनभाग म्हणून मी तुला देईन.”


त्या वेळी ते मोजके, फार थोडके होते, व तेही त्या देशात उपरे असे होते.


तुम्ही अबीब महिन्याच्या ह्या दिवशी निघाला आहात,


कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी आणि यबूसी ह्यांच्या देशात, म्हणजे जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा जो देश तुला देण्यास परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली त्या देशात तुला आणल्यावर ह्या महिन्यात तू हा सण पाळावा.


आणि जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती त्यात मी तुम्हांला नेईन आणि तो तुम्हांला वतन करून देईन; मी परमेश्वर आहे.”’


कान द्या, माझ्याकडे या; ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल; आणि मी तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हांला देईन.


मोशेने आपला सासरा मिद्यानी रगुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याला म्हटले, “परमेश्वराने आम्हांला देऊ केलेल्या प्रदेशाकडे आम्ही जात आहोत, तर तू आमच्याबरोबर चल म्हणजे आम्ही तुझे कल्याण करू; ‘कारण इस्राएलाचे कल्याण करीन’ असे परमेश्वर बोलला आहे.”


पण त्यात त्याला वतन ‘दिले नाही, पाऊलभरदेखील जमीन दिली नाही;’ त्याला मूलबाळ नव्हते तरी हा देश ‘त्याचा व त्याच्यामागे त्याच्या संततीच्या स्वाधीन कायमचा करण्याचे’ अभिवचन देवाने त्याला दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan