Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 6:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी आता फारोला काय करतो ते तू पाहशील. मी त्याला भुजप्रताप दाखवला म्हणजे तो ह्या लोकांना जाऊ देईल; मी त्याला भुजप्रताप दाखवला म्हणजे तो ह्यांना आपल्या देशातून बाहेर घालवून देईल.” मोशेला दुसर्‍यांदा झालेले पाचारण

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी आता फारोला काय करतो ते तू बघशील; मी माझे बाहुबल त्यास दाखवले म्हणजे मग तो माझ्या लोकांस जाऊ देईल. कारण माझ्या बाहुबलामुळे तो त्यांना आपल्या देशातून बाहेर घालवून देईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “आता मी फारोहला काय करतो, ते तू पाहशील: कारण माझ्या पराक्रमी हातामुळे तो लोकांना जाऊ देईल; कारण माझ्या बलवान हातामुळे तो त्यांना आपल्या देशाबाहेर घालवून देईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 6:1
27 Iomraidhean Croise  

त्या सरदाराने देवाच्या माणसाला म्हटले होते की, “परमेश्वराने आकाशकपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय?” त्याला त्याने प्रत्युत्तर दिले होते की, “तू आपल्या डोळ्यांनी पाहशील पण त्यांतले काही खाणार नाहीस.”


तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता त्याने देवाच्या माणसाला म्हटले, “पाहा, परमेश्वराने आकाशकपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय?” त्याने त्याला म्हटले, “तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील पण त्यांतले काही खाणार नाहीस.”


ह्या लढाईत तुम्हांला लढावे लागणार नाही; हे यहूदा, हे यरुशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करील ते पाहा.’ घाबरू नका, कचरू नका; उद्या त्यांच्यावर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्याबरोबर आहे.”


परमेश्वर म्हणतो, “दीनांवरील जुलमामुळे व कंगालांच्या उसाशामुळे मी आता उठलो आहे, ज्या आश्रयाचा सोस त्याला लागला आहे, त्यात मी त्याला सुरक्षित ठेवीन.”


परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत; भट्टीत सात वेळा शुद्ध करून जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुप्यासारखी ती आहेत.


ज्याने प्रतापी हाताने व पुढे केलेल्या बाहूने त्यांना बाहेर आणले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.


तुझा भुज पराक्रमी आहे; तुझा हात बळकट आहे, तुझा उजवा हात उभारलेला आहे.


नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी फारोवर आणि मिसर देशावर आणखी एक पीडा आणीन, त्यानंतर तो तुम्हांला येथून जाऊ देईल; आणि तो जाऊ देताना तुम्हांला येथून कायमचे घालवून देईल.


तेव्हा फारोने रातोरात मोशे व अहरोन ह्यांना बोलावून सांगितले, तुम्ही व सगळे इस्राएल लोक माझ्या लोकांतून निघून जा; तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन परमेश्वराची सेवा करा.


इस्राएल लोकांनी देशातून धांदलीने निघून जावे म्हणून मिसरी लोकांनी त्यांच्यामागे तगादा लावला; ते म्हणाले, “आम्ही सगळे मेलोच आहोत.”


त्यांनी आपल्याबरोबर मिसर देशातून मळलेली कणीक आणली होती, तिच्या बेखमीर भाकरी भाजल्या, तिच्यात काही खमीर नव्हते; मिसर देशातून त्यांना जबरीने बाहेर काढले होते, म्हणून त्यांना थांबायला अवकाश मिळाला नाही; त्यांना खाण्यासाठी काही तयार करून घेता आले नाही.


पुढील काळी तुझा मुलगा तुला विचारील की हे काय आहे? तेव्हा त्याला सांग, ‘मिसर देशातून, दास्यगृहातून परमेश्वराने आम्हांला आपल्या भुजबलाने बाहेर आणले,


हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान कपाळपट्टी असे असावे; कारण परमेश्वराने आपल्या बलवान हाताने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले.”


मोशे लोकांना म्हणाला, “ह्या दिवसाची आठवण ठेवा; ह्याच दिवशी तुम्ही मिसरातून, दास्यगृहातून बाहेर निघालात; परमेश्वराने आपल्या बलवान हाताने तुम्हांला ह्या ठिकाणातून बाहेर आणले म्हणून ह्या दिवशी खमिराची भाकर खायची नाही.


हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान स्मारक असे असावे; परमेश्वराचा नियम तुझ्या तोंडी असावा; कारण परमेश्वराने भुजबलाने तुला मिसर देशातून बाहेर आणले;


मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा, कारण ज्या मिसरी लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाहीत.


हे परमेश्वरा, तुझा उजवा हात बळाने प्रतापी झाला आहे; हे परमेश्वरा, तुझा उजवा हात शत्रूला चिरडून टाकतो.


तरी फारो तुमचे काही ऐकणार नाही. मग मी मिसरावर आपला हात टाकीन आणि त्यांना मोठ्या शिक्षा करून मी माझ्या सेना, माझे लोक, इस्राएलवंशज ह्यांना मिसर देशातून बाहेर काढीन.


आणि मिसरावर मी आपला हात उभारून त्यांच्यामधून इस्राएल लोकांना बाहेर काढीन तेव्हा मिसर्‍यांना कळेल की, मी परमेश्वर आहे.”


ज्याने आपला प्रतापी भुज मोशेच्या उजव्या बाजूने चालवला, आपले नाम सर्वकाळ राहावे म्हणून ज्याने त्यांच्यापुढे समुद्र दुभागला,


परमेश्वर मोशेला म्हणाला, “परमेश्वराचा हात काय तोकडा पडला आहे? माझे म्हणणे तुझ्या प्रत्ययास येते की नाही हे तू आता पाहशील.”


याकोबावर काही मंत्रतंत्र चालायचे नाहीत; इस्राएलावर काही चेटूक चालायचे नाही. यथाकाळी याकोब व इस्राएल ह्यांच्याविषयी असे म्हणतील, ‘देवाने केवढे कार्य केले!’


ह्या इस्राएल लोकांच्या देवाने आमच्या पूर्वजांना निवडून घेतले, ते लोक मिसर देशात उपरे असताना त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी भुजाने त्यांना तेथून काढले.


‘आता पाहा, मी, मीच तो आहे, माझ्याशिवाय कोणी देव नाही; प्राणहरण व प्राणदान करणारा मीच आहे. मी घायाळ करतो आणि मीच बरे करतो; माझ्या हातून सोडवणारा कोणी नाही.


त्याप्रमाणेच तुमचा देव परमेश्वर ह्याने मिसर देशातून तुमच्यासाठी तुमच्यादेखत संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी बाहू आणि उगारलेला हात ह्यांच्या योगे भयप्रद कृत्ये केली तशी कृत्ये करून देवाने आपल्यासाठी एखादे राष्ट्र इतर राष्ट्रांमधून काढून घेण्याचा कधी प्रयत्न केला काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan