Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 5:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा फारो म्हणाला, “हा कोण परमेश्वर की ज्याचे ऐकून मी इस्राएलास जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला जाणत नाही, आणि इस्राएलास काही जाऊ देणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 फारो म्हणाला, “हा परमेश्वर कोण आहे? मी त्याचा शब्द का ऐकावा आणि इस्राएलाला जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वरास ओळखत नाही. म्हणून इस्राएलाला मी जाऊ देणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 यावर फारोह म्हणाला, “हा याहवेह कोण आहे, की मी त्याचे ऐकावे व इस्राएली लोकांना जाऊ द्यावे? मी याहवेहला ओळखत नाही. मी इस्राएलला जाऊ देणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 5:2
25 Iomraidhean Croise  

ह्या सर्व देशांच्या देवांपैकी कोणी आपला देश माझ्या हातून सोडवला? तर परमेश्वर माझ्या हातून यरुशलेम कसे सोडवणार?”


माझ्या वाडवडिलांनी ज्या राष्ट्रांचा सर्वस्वी संहार केला त्यांच्या सर्व देवांपैकी आपल्या लोकांना माझ्या हातातून वाचवणारा असा कोणी देव होता काय? तर तुमचा देव तुम्हांला माझ्या हातातून कसा सोडवील?


ह्यास्तव तुम्ही हिज्कीयास असे भुलवू व बहकवू देऊ नका; त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका; माझ्या हातातून व माझ्या वाडवडिलांच्या हातातून आपल्या लोकांचा बचाव करण्याची ताकद कोणत्याही राष्ट्राच्या किंवा राज्याच्या देवाला झाली नाही; तर माझ्या हातातून तुमचा बचाव करण्याची तुमच्या देवाला काय ताकद?”


‘पृथ्वीवरील मनुष्यांच्या हातांनी बनवलेल्या दैवतां-सारखाच यरुशलेमेचा देव आहे’ असे ते बोलले.


फारो, त्याचे सेवक, त्याच्या देशाचे सर्व लोक ह्यांना चिन्हे व अद्भुत कृत्ये तू दाखवलीस; कारण ते त्यांच्याशी गर्वाने वागत होते हे तुला ठाऊक होते; तू आपल्या नामाचा महिमा प्रकट केला; तो आजवर आहे.


कारण त्याने देवावर हात उचलला आहे, व सर्वसमर्थाशी उद्दामपणा केला आहे.


त्याने आपली मान ताठ करून, आपल्या ढालीची जाड बोंडे पुढे करून त्याच्यावर हल्ला केला आहे;


सर्वसमर्थ कोण आहे की आम्ही त्याची सेवा करावी? त्याची विनवणी करून आम्हांला लाभ तो काय?’


दुर्जन नाक वर करून म्हणतो, “तो झडती घेणार नाही;” “देव नाही” असेच त्याचे सर्व विचार असतात.


ते म्हणतात, “आम्ही आपल्या जिभेने प्रबळ होऊ, आमचे ओठ आमचेच आहेत, आमचा धनी कोण?”


परमेश्वर म्हणतो, “दीनांवरील जुलमामुळे व कंगालांच्या उसाशामुळे मी आता उठलो आहे, ज्या आश्रयाचा सोस त्याला लागला आहे, त्यात मी त्याला सुरक्षित ठेवीन.”


मूढ आपल्या मनात म्हणतो, “देव नाही,” लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करतात, सत्कर्म करणारा कोणी नाही.


पण मला ठाऊक आहे की, मिसर देशाचा राजा तुम्हांला जाऊ देणार नाही; त्याला भुजप्रताप दाखवल्या-शिवाय तो जाऊ देणार नाही.


परमेश्वर म्हणतो की, ‘मी परमेश्वर आहे हे तुला ह्यावरून कळेल : पाहा, मी आपल्या हातातली काठी नदीतल्या पाण्यावर मारीन तेव्हा त्या पाण्याचे रक्त होईल.


माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करीन, आणि “परमेश्वर कोण आहे?” असे म्हणेन; मी दरिद्री राहिल्यास कदाचित चोरी करीन, आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करीन.


पण तुम्ही जर म्हणाल, ‘आम्ही ह्या देशात राहणार नाही, म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकणार नाही,’


त्याला बेहोश करा, कारण त्याने परमेश्वराविरुद्ध बढाई मारली आहे; मवाब आपल्या वांतीत लोळेल, तो हास्यविषय होईल.


आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे; नाही घातले तर तुम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल; माझ्या हातांतून तुम्हांला सोडवील असा कोणता देव आहे?”


त्यांनी पित्याला व मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील.


आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.


तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.


ती सर्व पिढी पूर्वजांस मिळाल्यानंतर जी नवी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कार्याची ओळख राहिली नव्हती. इस्राएलांची नीतिभ्रष्टता व शास्त्यांचा अंमल


एलीचे पुत्र अधम होते; त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती.


नाबालाने दाविदाच्या सेवकांना म्हटले, “दावीद कोण? हा इशायाचा पुत्र कोण? आजकाल बहुत दास आपापल्या धन्याला सोडून पळून जातात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan