Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 5:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 विटा व रोजचे काम ह्यांत तुम्ही काही कमी करता कामा नये.” असे इस्राएलांच्या नायकांना बजावण्यात आले तेव्हा आपण फार पेचात आहोत असे त्यांच्या लक्षात आले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 आपण संकटात आहोत हे इस्राएली नायकांना समजले. कारण पूर्वी इतक्याच विटा व रोजचे काम त्यांना शक्य नव्हते.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 “तुम्हाला नेमून दिल्याप्रमाणे रोजचे विटा बनविण्याचे काम कमी केले जाणार नाही,” असे ऐकल्यावर आपण अडचणीत सापडलो आहोत, असे इस्राएली पुढाऱ्यांच्या लक्षात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 5:19
6 Iomraidhean Croise  

आता जा आणि आपले काम करा; तुम्हांला गवत काही मिळायचे नाही, आणि विटा तर नेहमीच्या इतक्याच करून दिल्या पाहिजेत.


ते फारोकडून निघाले तेव्हा मोशे व अहरोन त्यांची वाट पाहत उभे होते ते त्यांना आढळले.


तरी आजवर जेवढ्या विटा त्यांना कराव्या लागत होत्या तेवढ्या त्यांच्याकडून करवून घ्या, त्यात काही कमी करू नका; ते आळशी आहेत, म्हणून ते ओरड करीत आहेत की आम्हांला जाऊ द्या, आमच्या देवाला यज्ञ करू द्या.


मग ह्या भूतलावर चालू असलेल्या सर्व जुलमांचे मी पुन्हा निरीक्षण केले; तेव्हा पाहा, गांजलेल्यांचे अश्रू गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही; त्यांच्यावर जुलूम करणार्‍यांच्या ठायी बळ आहे, पण गांजलेल्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही.


एखाद्या प्रांतात दुर्बलांवर जुलूम होत आहे, न्याय व नीतिमत्ता ह्यांची पायमल्ली होत आहे, असे तू पाहिले तर त्यामुळे चकित होऊ नकोस; कारण वरिष्ठ माणसावर त्याहूनही वरिष्ठांची नजर असते आणि त्यांच्यावरही कोणी वरिष्ठ असतो.


आपल्या लोकांचा आश्रय तुटला आहे, बद्ध किंवा मुक्त असा कोणी उरला नाही, हे परमेश्वर पाहील तेव्हा तो त्यांचा न्याय करील, त्याला आपल्या सेवकाचा कळवळा येईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan