Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 40:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 मग दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व पवित्र निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 मग मेघाने सभामंडप झाकले आणि याहवेहच्या तेजाने निवासमंडप भरून गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 40:34
28 Iomraidhean Croise  

मी इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर काढले त्या दिवसापासून आजपर्यंत माझा निवास कधी मंदिरात झाला नाही; डेर्‍यातून व मंडपातून मी भ्रमण करीत आहे.


कर्णे वाजवणारे व गाणारे एका सुराने परमेश्वराची स्तुती व धन्यवाद करू लागले, आणि कर्णे, झांजा आदिकरून वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती ते उच्चस्वरे करू लागले; ती अशी : “तो उत्तम आहे, त्याची दया सनातन आहे.” तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले.


याजकांना परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना, कारण परमेश्वराच्या तेजाने ते भरून गेले होते.


हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत.


आणि रात्रीच्या शेवटच्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या व मेघाच्या स्तंभातून मिसरी सेनेकडे पाहून त्यांची त्रेधा उडवली.


अहरोन इस्राएलांच्या सर्व मंडळीशी बोलत असता त्यांनी रानाकडे नजर फिरवली, तेव्हा ढगात परमेश्वराचे तेज त्यांना दिसले.


मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान तयार करावे.


ह्या स्थळी मी इस्राएल लोकांना भेट देईन आणि माझ्या तेजाने मंडप पवित्र होईल.


मोशे मंडपात प्रवेश करी तेव्हा मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारापुढे उभा राही आणि परमेश्वर मोशेशी भाषण करीत असे.


कारण जो उच्च, परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो : “मी उच्च व पवित्रस्थानी वसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीही मी वसतो; येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो.


घोषणा करणार्‍यांच्या ह्या वाणीने उंबरठे हालले व मंदिर धुराने भरले.


परमेश्वराचे तेज करूबांवरून निघून मंदिराच्या उंबरठ्यावर आले होते; मंदिर मेघाने व्यापले होते व अंगण परमेश्वराच्या तेजाच्या प्रभेने भरून गेले होते.


परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याला सांग की, तू भलत्या वेळी पवित्रस्थानात अंतरपटाच्या आत कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नयेस, गेलास तर मरशील, कारण दयासनावरील मेघात मी दर्शन देत जाईन.


मी सर्व राष्ट्रांना हलवून सोडीन म्हणजे सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तू येतील;1 आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


ह्या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी ह्या स्थळाला शांती देईन,”’ असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


मोशे परमेश्वराशी बोलण्यास दर्शनमंडपात गेला तेव्हा साक्षपटाच्या कोशावर असलेल्या दयासनावरून म्हणजे दोन्ही करूबांमधून झालेली वाणी त्याने ऐकली; ह्या प्रकारे तो त्याच्याशी बोलला.


ते इस्राएली आहेत; दत्तकपणा, ईश्वरी तेज, करारमदार, नियमशास्त्रदान, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत;


तेव्हा देवाचे ‘तेज’ व पराक्रम ह्यांपासून निघालेल्या ‘धुराने मंदिर भरून गेले;’ आणि त्या सात देवदूतांच्या ‘सात पीडा’ संपेपर्यंत ‘कोणालाही मंदिरात जाता आले नाही.’


आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी : “‘पाहा,’ देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर ‘देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि’ देव स्वतः ‘त्याच्याबरोबर राहील.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan