Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 “ह्यावरून ते विश्वास धरतील की त्यांच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर ह्याचे तुला दर्शन झाले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 “म्हणजे ह्यावरून ते विश्वास धरतील, त्यांचा पूर्वजांचा-अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने तुला दर्शन दिले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 याहवेहने मोशेला सांगितले “हे अशासाठी की याहवेह त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर—अब्राहामाचे परमेश्वर, इसहाकाचे परमेश्वर आणि याकोबाचे परमेश्वर—यांचे तुला निश्चितच दर्शन झाले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 4:5
27 Iomraidhean Croise  

परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या संतानाला देणार.” परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली.


अब्राम नव्व्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्त्विकपणे राहा.


तो दिवसा भर उन्हाच्या वेळी डेर्‍याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने मम्रेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले;


तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, “खाली मिसरात जाऊ नकोस; मी सांगेन त्या देशात राहा.


आणि पाहा, परमेश्वर तिच्या वरती उभा राहून त्याला म्हणाला, “मी परमेश्वर तुझा पिता अब्राहाम ह्याचा देव व इसहाकाचा देव आहे; ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन;


त्याने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या देवासन्मुख माझे वडील अब्राहाम व इसहाक चालले, माझ्या जन्मापासून आजवर ज्या देवाने माझे पालन केले,


याकोब योसेफाला म्हणाला, “सर्वसमर्थ देवाने कनान देशातल्या लूज येथे मला दर्शन देऊन आशीर्वाद दिला;


संध्याकाळच्या यज्ञसमयी एलीया संदेष्टा पुढे होऊन म्हणाला, “हे परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांच्या देवा, इस्राएलामध्ये तूच देव आहेस, मी तुझा सेवक आहे, आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत हे सर्वांना कळू दे.


ते अगदी पहाटेस उठून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले; ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, “अहो यहूद्यांनो, अहो यरुशलेमनिवासी जनहो, ऐका; तुमचा देव परमेश्वर ह्याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल; त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.”


मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, मी दाट ढगातून तुझ्याकडे येतो ते ह्या हेतूने की, मी तुझ्याशी बोलत असताना लोकांनी ऐकावे आणि तुझ्यावरही नेहमी विश्वास ठेवावा.” मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले.


आणखी देवाने मोशेला सांगितले, “तू इस्राएल लोकांना सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे; हेच माझे सनातन नाव आहे व ह्याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल.


तू जा आणि इस्राएलाच्या वडील जनांस जमवून सांग; तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला दर्शन देऊन म्हटले की, माझे तुमच्यावर खरोखर लक्ष गेले आहे व मिसर देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे;


तुझे सांगणे ते ऐकतील; मग तू आणि इस्राएलाचे वडील जन मिसर देशाच्या राजाकडे जा व त्याला सांगा, इब्र्यांचा देव परमेश्वर आम्हांला भेटला आहे; तर आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करावा, म्हणून आम्हांला तीन दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे;


ते पाहण्यास मोशे तिकडे वळला असे परमेश्वराने पाहिले, आणि झुडपातून देवाने त्याला हाक मारून म्हटले, “मोशे, मोशे.” तेव्हा तो म्हणाला, “काय आज्ञा?”


तो आणखी म्हणाला, “मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले तोंड झाकले; कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला.


तेव्हा मोशेने उत्तर दिले, “पण ते माझा विश्वास धरणार नाहीत. माझे म्हणणे ऐकणार नाहीत; ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही.”


तेव्हा लोकांना विश्वास वाटला; परमेश्वराने इस्राएलवंशजांची भेट घेऊन त्यांची विपत्ती पाहिली हे त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी नमन करून त्याची आराधना केली.


परमेश्वराने मोशेला सांगितले, “आपला हात पुढे करून त्याचे शेपूट धर - त्याने हात पुढे करून ते धरले, तेव्हा त्या सापाची त्याच्या हातात काठी झाली;


एफ्राइमाचे शीर शोमरोन व शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र. तुम्ही भाव ठेवणार नाही तर तुमचा निभाव लागणार नाही.”’


परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले; तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे.


आणि मी तेथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही विश्वास ठेवावा; तरी आपण त्याच्याकडे जाऊ.”


मला माहीत आहे की, तू सर्वदा माझे ऐकतोस, तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरता मी बोललो; ह्यासाठी की, तू मला पाठवले आहेस असा त्यांनी विश्वास धरावा.”


नंतर त्याने थोमाला म्हटले, “तू आपले बोट इकडे कर. माझे हात पाहा. आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासहीन असू नकोस, तर विश्वास ठेवणारा अस.”


येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हांला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत.


परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे; कारण जी कार्ये सिद्धीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे.


तेव्हा तो म्हणाला, “बंधुजनहो व वडिलांनो, ऐका. आपला पूर्वज अब्राहाम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता ‘गौरवशाली देवाने’ त्याला दर्शन देऊन म्हटले,


पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात; ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणवून घ्यायला देवाला त्यांची लाज वाटत नाही; कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan