Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 39:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 लोकांनी काम केले ते सर्व मोशेने पाहिले. ते त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते, म्हणून त्याने त्यांना आशीर्वाद दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 लोकांनी काम केले ते सर्व मोशेने बारकाईने पाहिले; ते त्यांनी अगदी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 मोशेने कामाचे परीक्षण केले व पाहिले की त्यांनी याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणेच केले होते. म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 39:43
24 Iomraidhean Croise  

आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा सहावा दिवस.


त्याने त्याला असा आशीर्वाद दिला : “आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देवो;


होमबली व शांत्यर्पणे अर्पण केल्यावर दाविदाने सेनाधीश परमेश्वर ह्याच्या नामाने लोकांना आशीर्वाद दिला.


आणि अकराव्या वर्षी बूल महिन्यात म्हणजे आठव्या महिन्यात मंदिर आतल्या एकंदर उपकरणसाहित्यासहित नमुन्याप्रमाणे पुरे झाले. ह्याप्रमाणे ते मंदिर बांधण्यासाठी शलमोनाला सात वर्षे लागली.


मग राजाने मागे वळून इस्राएलाच्या सर्व मंडळीला आशीर्वाद दिला, तेव्हा ती सर्व मंडळी उठून उभी राहिली.


त्याने उभे राहून सर्व इस्राएल मंडळीस उच्च स्वराने आशीर्वाद दिला; तो म्हणाला,


दाविदाने होमबली व शांत्यर्पणे ह्यांची समाप्ती केल्यावर परमेश्वराच्या नामाने लोकांना आशीर्वाद दिला.


मग लेवीय याजकांनी उभे राहून लोकांना आशीर्वाद दिले; त्यांची वाणी देवाने ऐकली, आणि त्यांची प्रार्थना देवाच्या पवित्र निवासापर्यंत, स्वर्गापर्यंत जाऊन पोहचली.


मग राजाने मागे वळून इस्राएलाच्या सर्व मंडळीला आशीर्वाद दिला, तेव्हा ती सर्व मंडळी उठून उभी राहिली.


जे स्वसंतोषाने यरुशलेमेत राहण्यास कबूल झाले त्या सर्वांना लोकांनी धन्य म्हटले.


परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो! परमेश्वराला आपल्या कृतींपासून आनंद होवो!


शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो; ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते.


इस्राएल लोकांनी जाऊन तसे केले; परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना आज्ञा दिली त्याप्रमाणे त्यांनी केले. शेवटली पीडा :


निवासमंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या साहित्याचा नमुना तुला दाखवतो त्या सगळ्यांप्रमाणे तुम्ही ते तयार करावे.


परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती, तिला अनुसरून इस्राएल लोकांनी सगळे काम केले.


परमेश्वर मोशेला म्हणाला,


आणि परमेश्वरासमोर दिवे लावले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.


मोशे व अहरोन ह्यांनी तसे केले; परमेश्वराने त्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी केले.


मी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जाऊन तो फरात नदीजवळ लपवून ठेवला.


इस्राएल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापांबद्दल वर्षातून एकदा प्रायश्‍चित्त करण्यात यावे, म्हणून हा तुम्हांला निरंतरचा विधी होय.”परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने केले.


मग यहोशवाने त्यांना आशीर्वाद देऊन रवाना केले, आणि ते आपापल्या डेर्‍यांकडे चालते झाले.


मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने बाशानात वतन दिले होते, पण त्यांच्या दुसर्‍या अर्ध्या वंशाला यहोशवाने यार्देनेच्या पश्‍चिमेस त्यांच्या भाऊबंदांमध्ये वतन दिले होते. यहोशवाने त्यांना आपापल्या डेर्‍यांकडे रवाना केले तेव्हा त्यांना आशीर्वाद देऊन तो म्हणाला,


Lean sinn:

Sanasan


Sanasan