Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 39:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 ह्या प्रकारे दर्शमंडपाच्या निवासमंडपाचे सर्व काम समाप्त झाले; परमेश्वराने आज्ञा दिली होती तिला अनुसरून इस्राएल लोकांनी हे सर्व केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 अशा प्रकारे पवित्र निवासमंडपाचे म्हणजे दर्शनमंडपाचे सर्व काम पूर्ण झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 याप्रकारे निवासमंडप व सभामंडप यांचे काम समाप्त झाले. इस्राएली लोकांनी जे काही याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याप्रमाणेच केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 39:32
24 Iomraidhean Croise  

आणि अकराव्या वर्षी बूल महिन्यात म्हणजे आठव्या महिन्यात मंदिर आतल्या एकंदर उपकरणसाहित्यासहित नमुन्याप्रमाणे पुरे झाले. ह्याप्रमाणे ते मंदिर बांधण्यासाठी शलमोनाला सात वर्षे लागली.


तसेच हीरामाने गंगाळे, फावडी व कटोरी ही बनवली. ह्या प्रकारे हीरामाने शलमोन राजासाठी परमेश्वराच्या मंदिराचे जे काम करायचे होते ते संपवले ते असे :


“परमेश्वराकडून जे काही ह्या नमुन्याप्रमाणे मला कळले ते मी सर्व समजून घेऊन लिहून दिले आहे.” [असे दाविदाने म्हटले.]


इस्राएल लोकांनी जाऊन तसे केले; परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना आज्ञा दिली त्याप्रमाणे त्यांनी केले. शेवटली पीडा :


पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्यांप्रमाणे ह्या सर्व वस्तू बनवण्याकडे तू लक्ष दे.


म्हणजे दर्शनमंडप, साक्षपटाचा कोश आणि त्यावरील दयासन आणि तंबूचे सर्व सामान,


ती मंदिलावर बांधता यावी म्हणून तिला त्यांनी निळ्या रंगाची फीत लावली; परमेश्वराने मोशेला सांगितल्या-प्रमाणे हे केले.


त्यांनी मग तो निवासमंडप मोशेकडे आणला; तंबू व त्याचे सर्व सामान म्हणजे त्याच्या आकड्या, त्याच्या फळ्या, त्याचे अडसर, त्याचे खांब व त्याच्या उथळ्या;


परमेश्वर मोशेला म्हणाला,


त्यामध्ये साक्षपटाचा कोश ठेव आणि तो अंतरपटाने झाक.


ते दर्शनमंडपात किंवा वेदीजवळ जात तेव्हा ते आपले हातपाय तेथे धूत; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.


कोश, मेज, दीपवृक्ष, वेद्या आणि पवित्रस्थानात सेवेसाठी असलेली पात्रे व पडदा ही त्यांच्या स्वाधीन करावीत व त्यांची निगा राखण्याची कामगिरी त्यांच्याकडे सोपवावी.


जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”


मी तुला आज्ञापीत आहे ती प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाळ; तिच्यात अधिकउणे काही करू नकोस.


जसा, ‘मोशे देवाच्या सबंध घरात विश्वसनीय’ होता तसा तोही त्याला ज्याने नेमले त्याच्याशी विश्वसनीय होता.


“पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनवण्याची सावधगिरी ठेव,” ही आज्ञा, मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी मिळाली, तसे तेही, जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करतात.


तेव्हा शमुवेल म्हणाला, “परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्यांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan