Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 38:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 त्याने गंगाळ व त्याची बैठक पितळेची बनवली. दर्शनमंडपाच्या दाराजवळ सेवा करीत असलेल्या स्त्रियांच्या आरशांचे हे पितळ होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 दर्शनमंडपाच्या दारापाशी सेवा करण्याऱ्या स्रियांनी अर्पण म्हणून आणलेल्या पितळी आरशांचे पितळ घेऊन त्याने गंगाळ व त्याची बैठक बनवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मग त्यांनी कास्याचे गंगाळ व त्याची बैठक सुद्धा कास्याची बनविली. सभामंडपाच्या दाराशी सेवा करणार्‍या स्त्रियांच्या आरशांचे ते बैठक होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 38:8
23 Iomraidhean Croise  

आणखी त्याने पितळेची दहा गंगाळे केली होती; एकेका गंगाळात चाळीस-चाळीस बथ पाणी राहत असे; त्या प्रत्येक गंगाळाचा व्यास चार हात होता; त्या दहा चौरंगांतील प्रत्येकावर एकेक गंगाळ होते.


आणखी त्याने पितळ ओतून गंगाळसागर केला; ह्या काठापासून त्या काठापर्यंत त्याचा व्यास दहा हात होता; त्याचा आकार वाटोळा होता, त्याची उंची पाच हात होती व त्याच्या परिघाला तीस हात सूत लागे.


हे परमेश्वरा, मी निर्दोषतेने आपले हात धुईन आणि तुझ्या वेदीला फेरा घालीन;


मग परमेश्वर मोशेला म्हणाला,


होमवेदी व तिचे सर्व सामान आणि गंगाळ व त्याची बैठक,


वेदी उचलण्यासाठी तिच्या बाजूंच्या कड्यांत दांडे घातले; वेदी मध्यभागी पोकळ ठेवून बाजूंना फळ्या बसवून ती बनवली.


दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्या दरम्यान गंगाळ ठेवून त्यात पाणी भर.


जो माझ्या दारांशी नित्य जागत राहून, माझ्या दारांच्या खांबांजवळ उभा राहून, माझे ऐकतो तो धन्य.


आरसे, मलमलीची वस्त्रे, दुपट्टे व ओढण्या ह्यांची शोभा नाहीशी करील.


पाप व अशुद्धता दूर करण्यास त्या दिवशी दाविदाच्या घराण्यासाठी व यरुशलेमनिवाशांसाठी एक झरा फुटेल.


इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता; तेव्हा एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, “तूही गालीलकर येशूबरोबर होतास.”


आता ती चौर्‍याऐंशी वर्षांची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे.


येशूने त्याला म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायांखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही. कारण तो सर्वांगी शुद्ध आहे; आणि तुम्ही शुद्ध आहात, पण सगळे जण नाहीत.”


पण पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला होता, म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता, त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले.


जी खरोखरीची विधवा आहे म्हणजे एकटी पडलेली आहे, तिने आपली आशा देवावर ठेवली आहे, आणि ती रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करत राहते;


खाणे, पिणे, नाना प्रकारची क्षालने ह्यांसह ती अर्पणे, केवळ दैहिक विधी आहेत; ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत.


मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये; जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे.


आणि ‘विश्वसनीय साक्षी,’ मेलेल्यांमधून ‘प्रथम जन्मलेला’ व ‘पृथ्वीवरील राजांचा अधिपती’ येशू ख्रिस्त ह्याच्यापासून, तुम्हांला कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला ‘पातकांतून मुक्त केले,’


एली फार वृद्ध झाला होता; त्याच्या पुत्रांनी सगळ्या इस्राएल लोकांशी कसकसा व्यवहार केला आणि दर्शनमंडपाच्या दाराशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांशी त्यांनी कसे कुकर्म केले हे सर्व त्याच्या कानावर आले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan