Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 37:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 त्या करूबांचे पंख असे पसरले होते की, त्यांनी ते दयासन झाकले होते; त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनासमोर लागलेली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्या करुबांचे पंख वर असे पसरले होते की त्यांनी ते दयासन झाकले होते; त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 या करुबांची पंखे वरच्या बाजूने पसरून प्रायश्चिताच्या झाकणावर आच्छादन करीत होते. करुबांची मुखे समोरासमोर असून त्यांची दृष्टी प्रायश्चिताच्या झाकणाकडे होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 37:9
15 Iomraidhean Croise  

तेव्हा त्याला स्वप्न पडले त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे; आणि तिच्यावरून देवदूत चढतउतरत आहेत.


देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणार्‍या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करूबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली.


आतल्या गाभार्‍यात त्याने ते करूब ठेवले; करूबांचे पंख असे पसरले होते की एका करूबाचा एक पंख एका बाजूच्या भिंतीला व दुसर्‍या करूबाचा एक पंख दुसर्‍या बाजूच्या भिंतीला लागलेला होता; त्याचे दुसरे दोन पंख गाभार्‍याच्या मधोमध एकमेकांना लागलेले होते.


त्या करूबांचे पंख असे पसरलेले असावेत की त्यांनी ते दयासन झाकले जावे आणि त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी.


त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनवले, त्याची लांबी दोन हात व रुंदी एक हात व उंची दीड हात होती;


त्याने एक करूब एका टोकासाठी व दुसरा करूब दुसर्‍या टोकासाठी बनवला; करूब व दयासन अखंड असून ते करूब त्याने दोन्ही टोकांना बनवले.


त्याच्या भोवताली सराफीम उभे होते; त्या प्रत्येकाला सहा-सहा पंख होते; दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे.


आणखी तो त्याला म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल.”


परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत;2 आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत.


ह्यासाठी की, जो युगादिकालाचा संकल्प त्याने ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी ह्यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे.


इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा,


सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे; तो1 देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रांत घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला.


ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय?


त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की, स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हांला सुवार्ता सांगणार्‍यांनी त्या गोष्टी तुम्हांला आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळवण्याची सेवा ते स्वत:साठी नव्हे, तर तुमच्यासाठी करत होते; त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan