Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 34:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तू आपल्यासाठी ओतीव देव करू नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तू आपल्यासाठी ओतीव देव करू नको.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 “तुम्ही आपल्यासाठी कोणतीही मूर्ती करू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 34:17
14 Iomraidhean Croise  

तुम्ही मूर्तींकडे वळू नये आणि आपल्यासाठी ओतीव देव करू नयेत; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञा केली होती तो मार्ग लवकरच सोडून ते बहकून गेले आहेत; त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजाअर्चा केली. त्याला बली अर्पण केले. ‘हे इस्राएला, ज्यांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव,’ असे ते म्हणू लागले आहेत.”


तुम्ही पाहता व ऐकता की, हातांनी केलेले देव हे देवच नाहीत असे ह्या पौलाने केवळ इफिसातच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात बोलून व पुष्कळ लोकांच्या मनात भरवून त्यांना फितवले आहे.


तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण, ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये.


प्रत्येक मनुष्य पशुतुल्य व ज्ञानशून्य झाला आहे; प्रत्येक मूर्तिकार मूर्तीमुळे लज्जित झाला आहे; कारण त्याने ओतलेली मूर्ती साक्षात लबाडी आहे, त्यांच्यात मुळीच प्राण नाही.


आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस.


तुम्ही माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका. आपल्यासाठी सोन्यारुप्याचे देव करू नका.


तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस.


‘जो परमेश्वराला वीट आणणारी कोरीव अथवा ओतीव मूर्ती कारागिराकडून करवून तिची गुप्तपणे स्थापना करतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.


त्याने ती अकराशे चांदीची नाणी आपल्या आईला परत केल्यावर ती म्हणाली, “माझ्या मुलाच्या हितासाठी माझे हे पैसे मी परमेश्वराला मनापासून समर्पित केले आहेत. ह्यांची एक कोरीव मूर्ती व एक ओतीव मूर्ती करावी म्हणून हे पैसे मी आता तुला परत करते.”


पण तुझ्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा तू अधिक दुराचरण केले आहेस; मला सोडून तू अन्य देव व ओतीव मूर्ती केल्या आहेत; अशाने तू मला चिडवून संतप्त केले आहे आणि माझ्याकडे पाठ केली आहेस.


तो इस्राएलाच्या राजांच्या मार्गांनी चालला; त्याने बआल दैवतांच्या ओतीव मूर्ती केल्या.


वर्षातून तीनदा तू माझ्याप्रीत्यर्थ मेळा भरवून सण पाळ.


Lean sinn:

Sanasan


Sanasan