Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 34:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 त्यांच्या मुलींपैकी कोणी तू आपल्या मुलांकरता बायका करून घेशील, आणि त्यांच्या मुली व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे जातील आणि तुझ्या मुलांना व्यभिचारी बुद्धीने त्यांच्या नादी लावतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 त्यांच्या कन्यांची तुम्ही आपल्या पुत्रांसाठी पत्नी म्हणून निवड कराल; त्यांच्या कन्या व्यभिचारी मतीने आपल्या देवाच्यामागे जातील आणि त्या तुमच्या पुत्रांना व्यभिचारी बुध्दीने त्यांच्या नादी लावतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 आणि जेव्हा तुम्ही त्यांच्यातील काही कन्या तुमच्या पुत्रांसाठी पत्नी म्हणून निवडाल आणि त्या कन्या त्यांच्या दैवतांशी व्यभिचार करतील, त्या तुमच्या मुलांनाही तसेच करण्यासाठी प्रवृत्त करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 34:16
23 Iomraidhean Croise  

मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी ह्यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकांत मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीही नवरी माझ्या मुलासाठी तू पाहणार नाहीस.


शलमोन राजा फारोच्या कन्येशिवाय आणखी मवाबी, अम्मोनी, अदोमी, सीदोनी व हित्ती राष्ट्रांतल्या विदेशी स्त्रियांच्या नादी लागला; व त्यांतल्या स्त्रियांवर त्याचे प्रेम जडले.


(अहाबासारखा दुसरा कोणी झाला नाही; त्याची बायको ईजबेल हिने त्याला उत्तेजन दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करण्यासाठी स्वतःला विकून टाकले होते;


त्याने आणखी यहूदाच्या पहाडांवर उच्च स्थाने बांधली आणि यरुशलेमेतल्या रहिवाशांना व्यभिचारी मतीने चालायला लावून यहूदास बहकवले.


तर तुम्ही आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना देऊ नयेत; व त्यांच्या कन्या आपल्या पुत्रांना करू नयेत, त्यांचे क्षेमकुशल कधीही चिंतू नये, म्हणजे तुम्ही मजबूत होऊन त्या देशाचे उत्तम फळ चाखाल आणि आपल्यामागे आपल्या वंशजांना तो निरंतरचे वतन ठेवून जाल.’


त्यांनी आपणांस व आपल्या पुत्रांस त्यांच्या कन्या केल्या आहेत; पवित्र बीज देशोदेशीच्या लोकांत मिसळून गेले आहे; सरदार व शास्ते ह्यांचा हात ह्या पातकात प्रमुख आहे.”


आम्ही आमच्या मुली ह्या देशातल्या लोकांना देणार नाही व त्यांच्या मुली आमच्या मुलांना करणार नाही;


ह्या देशाच्या लोकांनी शब्बाथ दिवशी एखादी वस्तू अथवा अन्नसामग्री विकण्यास आणली, तर आम्ही ती त्यांच्याकडून शब्बाथ दिवशी किंवा एखाद्या पवित्र दिवशी विकत घेणार नाही; सातव्या वर्षी आमची जमीन आम्ही पडीत ठेवू आणि लोकांकडचे कर्ज वसूल करणे असेल ते सोडून देऊ.


त्या दिवसांत अश्दोदी, अम्मोनी व मवाबी स्त्रियांशी लग्ने केलेले यहूदी लोक मला आढळले;


मी त्या लोकांशी वाद केला, मी त्यांना शिव्याशाप दिले, त्यांतल्या कित्येकांना मार दिला आणि त्यांचे केस उपटून देवाची शपथ घेऊन असे म्हणायला लावले की, “आम्ही इत:पर आमच्या कन्या त्यांच्या पुत्रांना देणार नाही आणि त्यांच्या कन्या आम्ही व आमचे पुत्र करणार नाही.


ते आपल्या कृत्यांनी भ्रष्ट झाले; ते आपल्या कृतींनी अनाचारी बनले.


परमेश्वर होशेयाबरोबर प्रथम बोलला तेव्हा तो त्याला म्हणाला, “जा, एक जारिणी बायको करून घे व जारकर्माची मुले आपली अशी करून घे; कारण परमेश्वराचा त्याग करणे हे घोर जारकर्म हा देश करीत आहे.”


त्याने स्वजनांमध्ये आपली संतती भ्रष्ट होऊ देऊ नये, कारण त्याला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.”


पण जर तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याच्यापासून परावृत्त व्हाल, तुमच्यात वस्ती करून असलेल्या उरलेल्या राष्ट्रांना धरून राहाल व त्यांच्याशी सोयरीक करून दळणवळण ठेवाल,


तर हे पक्के समजा की, ह्यापुढे तुमचा देव परमेश्वर ह्या राष्ट्रांना तुमच्या दृष्टीपुढून घालवून देणार नाही, पण ती तुम्हांला पाश व सापळा, तुमच्या कुशीला चाबूक व डोळ्यांना काटे अशी होतील; आणि अखेरीस जी उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला दिली आहे तिच्यातून तुमचा नायनाट होईल.


त्याचे आईबाप त्याला म्हणाले, “तू त्या बेसुनत पलिष्ट्यांतली बायको का करू पाहत आहेस? तुझ्या भाऊबंदांत किंवा आपल्या सार्‍या लोकांत कोणी मुली नाहीत काय?” शमशोन आपल्या बापाला म्हणाला, “तीच मला मिळवून द्या; कारण माझे तिच्यावर मन बसले आहे.”


अशा प्रकारे इस्राएल लोक कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्यामध्ये राहू लागले.


ते त्यांच्या मुलींशी विवाह करू लागले, आपल्या मुली त्यांच्या मुलांना देऊ लागले आणि त्यांच्या देवांची सेवा करू लागले. कुशन-रिशाथईमच्या हातांतून अथनिएल इस्राएल लोकांना सोडवतो


गिदोनाने त्यांचे एक एफोद करून आपले नगर अफ्रा येथे ते ठेवले. सर्व इस्राएल लोक तेथे जाऊन व्यभिचारी मतीने त्या एफोदाच्या नादी लागले; ते गिदोन व त्याचे घराणे ह्यांना पाश असे झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan