Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 34:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मी तुला आज्ञा देऊन सांगतो, ते तू पाळ; मी तुझ्यासमोरून अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्या लोकांना घालवून देतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मी आज तुला ज्या आज्ञा देतो त्या तू पाळ म्हणजे मग मी अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी या लोकांस तुझ्यासमोरुन घालवून देतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मी तुला आज जे आज्ञापितो ते तू पाळावे. मी तुमच्यापुढून अमोरी, कनानी, हिथी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी यांना घालवून देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 34:11
23 Iomraidhean Croise  

यबूसी, अमोरी, गिर्गाशी,


त्या दिवसांत अश्दोदी, अम्मोनी व मवाबी स्त्रियांशी लग्ने केलेले यहूदी लोक मला आढळले;


मी तुझ्यापुढे गांधीलमाशा पाठवीन; त्या हिव्वी, कनानी आणि हित्ती ह्यांना तुझ्यापुढून पळायला लावतील.


मिसर देशातल्या विपत्तीतून सोडवून कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात, तुम्हांला घेऊन जाईन असे मी सांगितले आहे म्हणून कळव.


त्यांना मिसरी लोकांच्या हातातून सोडवावे, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.


मी तुझ्यापुढे एक दूत पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्यांना तेथून घालवून देईन.


आम्ही रानात तीन दिवसांच्या वाटेवर जाऊ आणि परमेश्वर आमचा देव आम्हांला सांगेल त्याप्रमाणे त्याला यज्ञ करू.”


जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”


ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वत: त्याला प्रकट होईन.”


तुझा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे चांगले व योग्य ते तू केल्याने तुझे व तुझ्या पश्‍चात तुझ्या संततीचे निरंतर कल्याण व्हावे म्हणून ज्या आज्ञा मी तुला करीत आहे त्या लक्षपूर्वक ऐक.


मी तुला आज्ञापीत आहे ती प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाळ; तिच्यात अधिकउणे काही करू नकोस.


तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील;


अनादी देव तुझा आश्रय आहे, सनातन बाहूंचा तुला आधार आहे; त्याने शत्रूला तुझ्यापुढून हाकून दिले व म्हटले, त्याचा नाश कर.


तुझे व तुझ्यामागून तुझ्या वंशजांचे बरे व्हावे, आणि तुझा देव परमेश्वर जो देश तुला निरंतरचा देत आहे त्यात तू चिरकाळ राहावेस म्हणून आज मी तुला देत असलेले विधी आणि आज्ञा ह्यांचे पालन कर.”


म्हणून तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा काळजीपूर्वक पाळा; उजवीडावीकडे वळू नका.


आपण आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर त्याच्या सांगण्याप्रमाणे ही संपूर्ण आज्ञा काळजीपूर्वक पाळली तर ते आपले नीतिमत्त्व ठरेल.’


म्हणून, हे इस्राएला, श्रवण कर, आणि त्या काळजीपूर्वक पाळ म्हणजे तुझे कल्याण होईल; आणि तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तू बहुगुणित होशील.


तू प्रत्यक्ष पाहिलेली संकटे, चिन्हे व चमत्कार, तसेच पराक्रमी बाहू व उगारलेला हात ह्यांच्या योगे तुझा देव परमेश्वर ह्याने तुला काढून आणले हेही चांगले आठव. ज्या राष्ट्रांची तुला भीती वाटत आहे त्या सर्वांचे तुझा देव परमेश्वर तसेच करील.


आणि तुमचा देव परमेश्वर स्वत: त्यांना तुमच्यापुढून हाकून लावील आणि तुमच्या दृष्टीसमोरून घालवून देईल. तुमचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यांचा देश वतन करून घ्याल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan