निर्गम 34:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
10 परमेश्वर म्हणाला, “पाहा, मी एक करार करतो; तुझ्या सर्व लोकांदेखत मी अशी अद्भुत कृत्ये करीन की तशी सर्व पृथ्वीभर कोणत्याही राष्ट्रात झाली नाहीत; ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सगळे परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे.
10 मग परमेश्वर म्हणाला, “पाहा, मी तुझ्या सर्व लोकांबरोबर हा करार करीत आहे; आतापर्यंत पृथ्वीवरील कोणत्याही राष्ट्रासाठी यापूर्वी कधीही केलेले नाहीत ते चमत्कार मी करीन; ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सर्व लोक परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे.
10 तेव्हा याहवेहने उत्तर दिले: “मी तुझ्याशी एक करार करीत आहे. तुझ्या लोकांसमोर मी असे चमत्कार करेन की जे संपूर्ण पृथ्वीवर कोणत्याही राष्ट्रात करण्यात आले नाहीत. ज्या लोकांमध्ये तू राहतो ते पाहतील की मी, याहवेहने तुझ्यासाठी केलेली कृत्ये किती भयावह आहेत.
तुझ्या इस्राएल प्रजेसमान भूतलावर दुसरे कोणते तरी राष्ट्र आहे काय? आपली प्रजा करून घेण्यासाठी इस्राएलास सोडवण्यास तू गेलास, आपले नाव केलेस, त्यांच्यासाठी महत्कृत्ये केलीस, आपल्या लोकांना मिसर देशातून इतर राष्ट्रांच्या व देवांच्या हातांतून सोडवून घेतले आणि त्यांच्यादेखत आपल्या देशासाठी भयानक कृत्ये केलीस; असे करायला कोणत्या राष्ट्राचा देव गेला होता?
मोशे तेथे परमेश्वराबरोबर चाळीस दिवस व चाळीस रात्री होता; त्याने भाकर खाल्ली नाही, तो पाणीही प्यायला नाही; आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे दहा वचने लिहून ठेवली.
त्यांच्या दुर्गाने त्यांचा विक्रय केला नसता, परमेश्वराने त्यांना परकीयांच्या हाती दिले नसते, तर एकाने सहस्रांचा पाठलाग कसा केला असता! दोघांनी दशसहस्रांना कसे पळवले असते!
तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला; लगेच लोकांनी आपापल्यासमोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते हस्तगत केले.