निर्गम 33:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
16 तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे हे कशावरून समजावे? तू आमच्याबरोबर आल्याने मी व तुझे प्रजाजन पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे झालो आहोत ह्यावरूनच ते समजायचे ना?”
16 तसेच तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या लोकांवर झाली आहे हे कशावरून समजावे? जर तू आमच्याबरोबर आल्याने मी व हे तुझे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकांहून वेगळे झालो आहो यावरूनच ते समजायचे ना?”
16 तुम्ही आम्हाबरोबर आला नाही, तर माझ्यावर आणि आपल्या लोकांवर तुमची कृपादृष्टी झाली आहे की नाही हे कसे कळणार? मी व तुमचे लोक पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपासून वेगळे आहोत हे कसे समजणार?”
तुझ्या इस्राएल प्रजेसमान भूतलावर दुसरे कोणते तरी राष्ट्र आहे काय? आपली प्रजा करून घेण्यासाठी इस्राएलास सोडवण्यास तू गेलास, आपले नाव केलेस, त्यांच्यासाठी महत्कृत्ये केलीस, आपल्या लोकांना मिसर देशातून इतर राष्ट्रांच्या व देवांच्या हातांतून सोडवून घेतले आणि त्यांच्यादेखत आपल्या देशासाठी भयानक कृत्ये केलीस; असे करायला कोणत्या राष्ट्राचा देव गेला होता?
कारण हे प्रभू देवा, तू आमच्या वडिलांना मिसर देशातून काढले त्या वेळी तुझा सेवक मोशे ह्याच्या द्वारे तू वचन दिलेस, त्यानुसार हे लोक तुझे वतन व्हावे म्हणून भूतलावरल्या सर्व राष्ट्रांपासून तू त्यांना वेगळे केले आहेस.”
परमेश्वर म्हणाला, “पाहा, मी एक करार करतो; तुझ्या सर्व लोकांदेखत मी अशी अद्भुत कृत्ये करीन की तशी सर्व पृथ्वीभर कोणत्याही राष्ट्रात झाली नाहीत; ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सगळे परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे.
आणि तो म्हणाला, “हे प्रभू, तुझी माझ्यावर आता कृपादृष्टी झाली असेल तर प्रभूने आमच्याबरोबर चालावे; हे लोक ताठ मानेचे आहेत; तरी आमचा अन्याय व पाप ह्यांची क्षमा कर व आम्हांला आपले वतन समजून आमचा अंगीकार कर.”
त्यांचा देश तुमचे वतन होईल, ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश तुमच्या ताब्यात देईन, असे मी तुम्हांला सांगितले आहे. तुम्हांला इतर राष्ट्रांपासून वेगळे करणारा मी परमेश्वर तुमचा देव आहे.
आता जर तू त्यांचा संहार केलास तर मिसरी लोक ते ऐकतील आणि ह्या देशातील रहिवाशांनाही ते सांगतील. ह्यांनी ऐकले आहे की, तू परमेश्वर ह्या लोकांमध्ये वस्ती करतोस आणि तू परमेश्वर त्यांना प्रत्यक्ष दर्शन देतोस; तुझा मेघ त्यांच्यावर असतो आणि तू दिवसा मेघस्तंभातून व रात्री अग्निस्तंभातून त्यांच्यापुढे चालत असतोस.
डोंगरमाथ्यावरून ते माझ्या दृष्टीस पडत आहेत, टेकड्यांवरून मी त्यांना पाहत आहे; पाहा, हे राष्ट्र अलिप्त राहणारे आहे, ते स्वतःला अन्य राष्ट्रांबरोबर गणत नाही.
त्याप्रमाणेच तुमचा देव परमेश्वर ह्याने मिसर देशातून तुमच्यासाठी तुमच्यादेखत संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी बाहू आणि उगारलेला हात ह्यांच्या योगे भयप्रद कृत्ये केली तशी कृत्ये करून देवाने आपल्यासाठी एखादे राष्ट्र इतर राष्ट्रांमधून काढून घेण्याचा कधी प्रयत्न केला काय?