Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 33:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मित्राशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे परत जात असे, तरी त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे. परमेश्वराच्या समक्षतेचे आश्वासन

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मित्रांशी बोलावे त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे माघारी जात असे. तरी मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 जसा एखादा व्यक्ती आपल्या मित्राशी बोलतो तसे याहवेह मोशेशी समोरासमोर बोलत असत. मग मोशे छावणीकडे परत जात असे, परंतु त्याचा तरुण सहकारी, नूनाचा पुत्र यहोशुआ हा मंडप सोडून जात नसे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 33:11
19 Iomraidhean Croise  

मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनीएल (देवाचे मुख) असे ठेवले, तो म्हणाला, “कारण मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला.”


हे आमच्या देवा, तू ह्या देशाच्या रहिवाशांना आपल्या इस्राएल प्रजेपुढून घालवून देऊन हा देश तुझा मित्र अब्राहाम ह्याच्या वंशजांना कायमचा दिला आहेस ना?


ह्यासाठी की त्याने देवाविरुद्ध मनुष्यातर्फे व इष्टमित्रांविरुद्ध मानवपुत्रांतर्फे वाद करावा.


तेव्हा मोशेने यहोशवाला सांगितले, “आपल्यांतले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर; उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन.”


तेव्हा मोशे व त्याचा सेवक यहोशवा हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर गेला.


यहोशवाने लोकांचा गलबला ऐकला तेव्हा तो मोशेला म्हणाला, “छावणीत लढाईचा आवाज ऐकू येत आहे.”


त्या मंडपाच्या दाराशी मेघस्तंभ उभा आहे असे सर्व लोक पाहत तेव्हा ते सगळे उठून आपापल्या तंबूच्या दाराशी दंडवत घालत.


मोशे मंडपात प्रवेश करी तेव्हा मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारापुढे उभा राही आणि परमेश्वर मोशेशी भाषण करीत असे.


मी परमेश्वर आहे; हे माझे नाम आहे; मी आपले गौरव दुसर्‍यास देऊ देणार नाही; मी आपली प्रशंसा मूर्तींना प्राप्त होऊ देणार नाही.


तेव्हा नूनाचा मुलगा यहोशवा जो तरुणपणापासून मोशेचा सेवक होता1 तो त्याला म्हणाला, “मोशे, माझ्या स्वामी, त्यांना मना कर.”


पण माझा सेवक मोशे ह्याच्या बाबतीत तसे नाही; माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे.


मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो; परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो; तर माझा सेवक मोशे ह्याच्याविरुद्ध बोलायला तुम्हांला भीती कशी नाही वाटली?”


हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे; पण मी त्याला झोपेतून उठवायला जातो.”


वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे, त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो; तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.


परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, तुझा अंतकाळ समीप आला आहे म्हणून यहोशवाला बोलाव आणि तुम्ही दोघे दर्शनमंडपात उपस्थित व्हा म्हणजे मी त्याला अधिकारसूत्रे देईन.” मग मोशे व यहोशवा दर्शनमंडपात उपस्थित झाले.


परमेश्वराच्या प्रत्यक्ष परिचयाचा असा मोशेसमान कोणी संदेष्टा इस्राएलात आजवर झाला नाही;


परमेश्वराने त्या पर्वतावर अग्नीमधून तुमच्याशी तोंडोतोंड भाषण केले;


“अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले;” आणि त्याला ‘देवाचा मित्र’ म्हणण्यात आले, हा शास्त्रलेख पूर्ण झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan