Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 32:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञा केली होती तो मार्ग लवकरच सोडून ते बहकून गेले आहेत; त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजाअर्चा केली. त्याला बली अर्पण केले. ‘हे इस्राएला, ज्यांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव,’ असे ते म्हणू लागले आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते त्या मार्गापासून किती लवकर ते बहकून गेले आहेत. त्यांनी आपल्यासाठी सोने वितळवून वासराची मूर्ती केली आहे; ते त्याची पूजा करीत आहेत व त्यास बली अर्पणे वाहत आहेत; ते म्हणत आहेत, ‘हे इस्राएला, याच देवांनी तुला मिसर देशातून बाहेर आणले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मी त्यांना दिलेल्या आज्ञांपासून ते फार लवकरच फिरले आहेत आणि आपल्यासाठी वासराची ओतीव मूर्ती तयार केली आहे. त्यांनी त्याच्यासमोर नमन केले आहे आणि यज्ञ करून म्हटले आहे, ‘हे इस्राएला, ही तुमची दैवते आहेत, ज्यांनी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर काढले आहे!’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 32:8
18 Iomraidhean Croise  

राजाने आपल्याबरोबरच्या लोकांचा सल्ला घेऊन दोन सोन्याची वासरे केली आणि लोकांना म्हटले, “आजवर तुमचे यरुशलेमेस जाणे झाले तेवढे पुरे; हे इस्राएला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणले तेच हे पाहा.”


त्यांनी ओतीव वासरू केले व ज्या देवाने तुला मिसर देशातून सोडवून आणले तोच हा असे म्हणून तुला संताप आणणारी कामे केली.


त्यांनी होरेब येथे वासराची मूर्ती केली, ओतीव मूर्तीची पूजा केली.


त्यांनी आपल्या मुखाने त्याच्याशी कपट केले, आणि आपल्या जिभेने त्याच्याशी लबाडी केली.


तुम्ही माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका. आपल्यासाठी सोन्यारुप्याचे देव करू नका.


परमेश्वराशिवाय दुसर्‍या दैवतांना बली अर्पण करणार्‍याचा अगदी संहार करावा.


त्याने ती त्यांच्या हातून घेऊन त्यांचे एक वासरू ओतून त्याला कोरणीने कोरले; तेव्हा ते म्हणू लागले की, “हे इस्राएला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव.”


तू सावध राहा. देशातील रहिवाशांशी तुला करारमदार करायचा नाही; नाहीतर ते व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे लागून त्यांना बलिदान करतील, आणि त्यांच्यातल्या कोणी तुला बोलावले असता तू त्यांच्या बलिदानातले काही खाशील;


जे थैलीतून सोने ओततात, जे काट्याने रुपे तोलून देतात, त्यांचे दैवत घडवण्यासाठी ते सोनारास मजुरीने लावतात, ते त्याच्या पाया पडतात, त्याला दंडवत घालतात;


परमेश्वर म्हणतो मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार होणार नाही; मी त्याच्याबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडला.


आणि ह्यामुळे व्यभिचारी मतीने अजदैवतांच्या (बोकड) मागे लागून त्यांना त्यांनी आपले यज्ञपशू अर्पण करू नयेत; हा तुम्हांला पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.


देव नाहीत अशा भुतांना, जे अलीकडेच नवीन निघाले आहेत, ज्यांना तुमचे पूर्वज भीत नव्हते, अशा अपरिचित देवांना त्यांनी बली अर्पण केले.


तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘ऊठ, येथून लवकर खाली जा; कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिसर देशातून काढून आणलेस ते बिघडले आहेत, आणि ज्या मार्गाने जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते तो एवढ्यातच सोडून ते बहकून गेले आहेत; त्यांनी स्वतःसाठी एक ओतीव मूर्ती केली आहे.’


मी पाहिले की तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध पाप केले होते; तुम्ही स्वतःसाठी एक ओतीव वासरू केले होते व ज्या मार्गाने जावे म्हणून परमेश्वराने तुम्हांला आज्ञापिले होते तो केव्हाच सोडून तुम्ही बहकून गेला होता.


ते गिलाद देशात रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांकडे जाऊन म्हणाले,


तरी ते आपल्या शास्त्यांचे ऐकत नसत; ते व्यभिचारी मतीने अन्य देवांच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागत. त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळून चोखाळलेला मार्ग त्यांनी लवकरच सोडून दिला आणि आपल्या पूर्वजांचे अनुकरण केले नाही.


गिदोन त्यांना पुढे म्हणाला, “तुमच्याकडे मला एक मागणी करायची आहे. तुम्ही प्रत्येकाने आपल्या लुटीतली कुंडले तेवढी मला द्यावीत.” (ते इश्माएली असल्यामुळे त्यांच्याजवळ सोन्याची कुंडले होती.)


Lean sinn:

Sanasan


Sanasan