Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 32:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “चल, खाली उतर, कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिसर देशातून आणले ते बिघडले आहेत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्या वेळी परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू पर्वत उतरुन लवकर खाली जा, कारण ज्या तुझ्या लोकांस तू मिसर देशातून बाहेर आणले ते बिघडले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मग याहवेह मोशेला म्हणाले, “खाली जा, कारण तुझे लोक, ज्यांना तू इजिप्तमधून बाहेर आणलेस, ते भ्रष्ट झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 32:7
17 Iomraidhean Croise  

परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते त्याने केले; त्याचा बाप उज्जीया ह्याच्या एकंदर वागणुकीप्रमाणे तो वागला; मात्र परमेश्वराच्या मंदिरात त्याने प्रवेश केला नाही. प्रजाजन अधिकाधिक बिघडत चालले.


त्यांनी आपल्या मुखाने त्याच्याशी कपट केले, आणि आपल्या जिभेने त्याच्याशी लबाडी केली.


तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तू उतरून खाली जा; आणि नंतर तू आणि तुझ्याबरोबर अहरोनाने वर यावे; याजकांनी व लोकांनी मर्यादा उल्लंघून परमेश्वराकडे येता कामा नये, नाहीतर तो त्यांना ताडन करील.”


मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, “ऊठ, आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव; कारण आम्हांला मिसर देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले हे आम्हांला कळत नाही.”


तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर ह्याची काकळूत करून म्हणाला, “हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने व भुजबलाने मिसर देशातून बाहेर आणलेस, त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा?


त्याने ती त्यांच्या हातून घेऊन त्यांचे एक वासरू ओतून त्याला कोरणीने कोरले; तेव्हा ते म्हणू लागले की, “हे इस्राएला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव.”


मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू व जे लोक तू मिसर देशातून आणले आहेत असे तुम्ही येथून निघून मार्गस्थ व्हा; व जो देश तुझ्या संततीला देईन असे अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना मी शपथपूर्वक सांगितले होते, त्या देशाकडे जा.


किती हे पापिष्ट राष्ट्र! दुष्कर्माने भारावलेले लोक, दुर्जनांची संतती! ही आचारभ्रष्ट मुले! ह्यांनी परमेश्वराला सोडले आहे, इस्राएलाच्या पवित्र प्रभूला तुच्छ मानले आहे; ती वियुक्त होऊन मागे फिरली आहेत.


आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्‍चित्त करावे, सनातन नीतिमत्ता उदयास आणावी, दृष्टान्त व संदेश मुद्रित करावेत आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा, हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर ह्यासंबंधाने सत्तर सप्तके ठरली आहेत.


गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळी झाले त्यासारखा त्यांनी अति भ्रष्टाचार केला आहे; तो त्यांचा अधर्म स्मरतो; तो त्यांच्या पापांचे प्रतिफळ देतो.


कारण मला ठाऊक आहे की, मी मेल्यावर तुम्ही अगदी बिघडून जाल; ज्या मार्गाने चालण्याची मी तुम्हांला आज्ञा केली आहे तो तुम्ही सोडून द्याल; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते तुम्ही कराल व आपल्या हातच्या कृतीने त्याला चीड आणाल म्हणून पुढील काळी तुमच्यावर विपत्ती येऊन पडेल.”


ते बिघडले आहेत, ते त्याचे पुत्र नव्हत, हा त्यांचा दोष आहे; ही विकृत व कुटिल पिढी आहे.


ह्यासाठी की, तुम्ही बिघडून जाऊन एखाद्या पुरुषाची अथवा स्त्रीची,


तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘ऊठ, येथून लवकर खाली जा; कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिसर देशातून काढून आणलेस ते बिघडले आहेत, आणि ज्या मार्गाने जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते तो एवढ्यातच सोडून ते बहकून गेले आहेत; त्यांनी स्वतःसाठी एक ओतीव मूर्ती केली आहे.’


तसेच होरेबातही तुम्ही परमेश्वराला संतापवले, तेव्हा तो इतका रागावला की, तो तुमचा संहारच करणार होता.


तरीपण शास्ता मरण पावला म्हणजे ते पुन्हा उलटून अन्य देवांची सेवा करत व त्यांच्या चरणी लागून आपल्या वाडवडिलांपेक्षा अधिक बिघडत; ते आपला दुराचार व दुराग्रह सोडत नसत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan