Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 32:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्याने ती त्यांच्या हातून घेऊन त्यांचे एक वासरू ओतून त्याला कोरणीने कोरले; तेव्हा ते म्हणू लागले की, “हे इस्राएला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 अहरोनाने लोकांकडून ते सोने घेतले; आणि ते ओतून व कोरणीने कोरून त्यापासून वासरू केले. मग लोक म्हणाले, “हे इस्राएला, ज्या देवाने तुला मिसर देशातून बाहेर आणले आहे तो हाच देव आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 लोकांनी जे अहरोनाच्या हातात दिले, ते घेऊन त्याने हत्याराने कोरून, वासराची ओतीव मूर्ती बनविली. मग ते म्हणाले, “हे इस्राएला, ही तुमचे दैवते आहेत, ज्यांनी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 32:4
36 Iomraidhean Croise  

राजाने आपल्याबरोबरच्या लोकांचा सल्ला घेऊन दोन सोन्याची वासरे केली आणि लोकांना म्हटले, “आजवर तुमचे यरुशलेमेस जाणे झाले तेवढे पुरे; हे इस्राएला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणले तेच हे पाहा.”


मग यराबामाने आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी यहूदातील सणासारखा एक सण केला आणि वेदीवर होमबली अर्पण केले; त्याप्रमाणे त्याने बेथेल येथे आपण केलेल्या वासरांप्रीत्यर्थ यज्ञ केले, आणि आपण केलेल्या उच्च स्थानांच्या याजकांना बेथेल येथे ठेवले.


येहू म्हणाला, “बआलाप्रीत्यर्थ एक पवित्र महासभा भरवा.” तेव्हा लोकांनी दवंडी पिटली.


तथापि नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएल लोकांना ज्या पापकर्मांच्या योगाने पाप करायला लावले ती पापकर्मे, अर्थात बेथेल व दान येथे असलेली सोन्याची वासरे ह्यांचा नाद येहूने सोडला नाही.


यराबामाने उच्च स्थानासाठी, बोकडांच्या मूर्तींसाठी व त्याने केलेल्या वासरांच्या मूर्तींसाठी आपलेच याजक नेमले.


आता दाविदवंशजांच्या हाती असलेले परमेश्वराचे जे राज्य त्याच्याशी तुम्ही विरोध करण्याचा विचार मांडला आहे; तुम्ही एकत्र होऊन तुमचा एक मोठा समुदाय झाला आहे आणि यराबामाने जी सोन्याची वासरे तुमचे देव व्हावेत म्हणून बनवली ती तुमच्याजवळ आहेत.


त्यांनी ओतीव वासरू केले व ज्या देवाने तुला मिसर देशातून सोडवून आणले तोच हा असे म्हणून तुला संताप आणणारी कामे केली.


ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.


तुम्ही माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका. आपल्यासाठी सोन्यारुप्याचे देव करू नका.


आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस.


रत्नांवर कोरीव काम करणार्‍याच्या कसबाने मुद्रा कोरली जाते त्याप्रमाणे त्या दोन्ही रत्नांवर इस्राएलांच्या मुलांची नावे कोरावीत आणि ती सोन्याच्या जाळीदार कोंदणांत बसवावीत.


मग दोन गोमेद रत्ने घेऊन त्यांवर इस्राएलांच्या मुलांची नावे त्यांच्या जन्माच्या क्रमाने कोरावीत;


मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, “ऊठ, आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव; कारण आम्हांला मिसर देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले हे आम्हांला कळत नाही.”


मी त्यांना सांगितले, ‘ज्यांच्याजवळ सोने असेल त्यांनी ते काढून मला द्यावे; त्याप्रमाणे त्यांनी ते मला दिले; मग मी ते अग्नीत टाकले तो त्यातून हे वासरू निघाले.”’


मग सर्व लोकांनी आपल्या कानांतील सोन्याची कुंडले काढून अहरोनाकडे आणली.


अहरोनाने बनवलेले वासरू लोकांनीच बनवले होते, म्हणून परमेश्वराने त्यांना ताडन केले.


हे पाहून अहरोनाने त्याच्यापुढे एक वेदी बांधली आणि असे जाहीर केले की, उद्या परमेश्वराप्रीत्यर्थ उत्सव करायचा आहे.


तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “चल, खाली उतर, कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिसर देशातून आणले ते बिघडले आहेत;


ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञा केली होती तो मार्ग लवकरच सोडून ते बहकून गेले आहेत; त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजाअर्चा केली. त्याला बली अर्पण केले. ‘हे इस्राएला, ज्यांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव,’ असे ते म्हणू लागले आहेत.”


तुमच्या रुपेरी कोरीव मूर्तींची मढवणी व तुमच्या सोनेरी ओतीव मूर्तींचा मुलामा तुम्ही अपवित्र लेखाल, एखाद्या अमंगळ वस्तूप्रमाणे त्या तुम्ही दूर फेकून द्याल; “चालती हो,” असे तुम्ही मूर्तीस म्हणाल.


जे थैलीतून सोने ओततात, जे काट्याने रुपे तोलून देतात, त्यांचे दैवत घडवण्यासाठी ते सोनारास मजुरीने लावतात, ते त्याच्या पाया पडतात, त्याला दंडवत घालतात;


मिसर देशातील आपली शिंदळकी तिने सोडून दिली नाही; तेथल्या पुरुषांनी तिच्या तारुण्यात तिच्याबरोबर गमन केले, त्यांनी तिची कौमार्यावस्थेतील स्तनाग्रे चुरली व तिच्याबरोबर मनसोक्त व्यभिचार केला.


बेथ-आवेनाच्या वासरांसाठी शोमरोनातले रहिवासी घाबरे होतील; तेथले लोक त्याच्याविषयी शोक करतील, त्याचे पुजारी जे त्याच्या वैभवाबद्दल आनंद करीत असत ते आता त्याकरता विलाप करतील, कारण ते त्यांना अंतरले आहे.


ते आताही अधिकाधिक पाप करीत आहेत, ते आपल्याजवळच्या रुप्याच्या आपणांसाठी ओतीव मूर्ती करीत आहेत; ते आपल्या कल्पनेप्रमाणे मूर्ती करीत आहेत; त्या सर्व कारागिरांच्या कृती आहेत; ते अशा मूर्तींबरोबर बोलतात, यज्ञ करणारी माणसे वासरांचे चुंबन घेतात.


तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण, ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये.


मग त्या दिवसांत ‘त्यांनी वासराची मूर्ती बनवली’ व तिच्यापुढे ‘यज्ञ करून’ आपल्या हातच्या कृतींबद्दल आनंदोत्सव केला.


त्यांच्यापैकी कित्येक मूर्तिपूजक होते तसे तुम्ही होऊ नका; कारण “लोक खायलाप्यायला बसले, नंतर नाचतमाशा करायला उठले” असे शास्त्रात लिहिले आहे.


मी पाहिले की तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध पाप केले होते; तुम्ही स्वतःसाठी एक ओतीव वासरू केले होते व ज्या मार्गाने जावे म्हणून परमेश्वराने तुम्हांला आज्ञापिले होते तो केव्हाच सोडून तुम्ही बहकून गेला होता.


गिदोन त्यांना पुढे म्हणाला, “तुमच्याकडे मला एक मागणी करायची आहे. तुम्ही प्रत्येकाने आपल्या लुटीतली कुंडले तेवढी मला द्यावीत.” (ते इश्माएली असल्यामुळे त्यांच्याजवळ सोन्याची कुंडले होती.)


गिदोनाने त्यांचे एक एफोद करून आपले नगर अफ्रा येथे ते ठेवले. सर्व इस्राएल लोक तेथे जाऊन व्यभिचारी मतीने त्या एफोदाच्या नादी लागले; ते गिदोन व त्याचे घराणे ह्यांना पाश असे झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan