जे लेवी सर्व इस्राएल लोकांना शिकवत असत व परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र झाले होते त्यांना त्याने सांगितले की, “इस्राएलाचा राजा दावीद ह्याचा पुत्र शलमोन ह्याने बांधलेल्या मंदिरात पवित्र कोश ठेवा; ह्यापुढे तुम्हांला आपल्या खांद्यांवर बोजा वागवण्याची जरूरी नाही; तर आता तुम्ही आपला देव परमेश्वर व त्याची प्रजा इस्राएल ह्यांची सेवा करा.