Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 32:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तसेच त्यांनी बनवलेले ते वासरू घेऊन त्याने अग्नीत टाकले व कुटून त्याचा चुरा केला; तो त्याने पाण्यावर टाकला. ते पाणी त्याने इस्राएल लोकांना प्यायला लावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 नंतर लोकांनी बनविलेले ते सोन्याचे वासरू मोशेने तोडून फोडून ते अग्नीत जाळले. व कुटून त्याची पूड केली; मग ती पाण्यात टाकली. नंतर ते पाणी त्याने इस्राएल लोकांस प्यायला दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 आणि त्याने ते वासरू घेतले जे लोकांनी घडविले होते व ते अग्नीत जाळून टाकले; मग त्याने त्याची कुटून बारीक पूड केली, ती पाण्यात विरघळून इस्राएलच्या लोकांना प्यायला दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 32:20
10 Iomraidhean Croise  

त्याने आपली आई माका हिला राजमातेच्या पदावरून दूर केले, कारण तिने अशेराप्रीत्यर्थ एक अमंगळ मूर्ती केली होती. तिने केलेली ती मूर्ती आसाने फोडूनतोडून किद्रोन ओहळाजवळ जाळून टाकली.


मग बेथेल येथे जी वेदी होती आणि जे उच्च स्थान इस्राएलाकडून पाप करवणारा नबाटपुत्र यराबाम ह्याने बांधले होते, ती वेदी व ते उच्च स्थान त्याने पाडून टाकले; ते उच्च स्थान जाळून टाकले, त्याचा भुगा केला व अशेरामूर्ती जाळून टाकल्या.


त्याने परमेश्वराच्या मंदिरातून अशेरामूर्ती बाहेर काढली व यरुशलेमेबाहेर किद्रोन ओहोळाजवळ नेऊन जाळून टाकली, पायांनी तुडवून तिचे चूर्ण केले व ते साधारण लोकांच्या कबरांवर फेकून दिले.


लोकांनी त्याच्यासमक्ष बआल मूर्तींच्या वेद्या मोडून टाकल्या; त्यांच्या वरच्या भागी असलेल्या सूर्यमूर्ती त्याने फोडूनतोडून टाकल्या; अशेरामूर्ती आणि कोरीव व ओतीव मूर्ती त्याने फोडून त्यांचे चूर्ण केले व ते चूर्ण जे त्यांना यज्ञ करीत असत त्यांच्या कबरांवर पसरले.


तेव्हा मोशे अहरोनाला म्हणाला, “तू ह्या लोकांवर एवढे पातक आणले असे ह्यांनी तुझे काय केले होते?”


म्हणून ते आपल्या वर्तनाचे फळ भोगतील, आपल्या मसलतीचे भरपूर फळ भोगतील;


भ्रांत चित्ताचा मनुष्य आपल्या वर्तनाचे फळ भोगतो, आणि सत्पुरुष आपल्या ठायी तृप्त असतो.


त्यांच्या देवांच्या कोरीव मूर्ती तुम्ही अग्नीत जाळून टाका; त्यांच्यावरील सोन्यारुप्याचा लोभ धरू नकोस व ते स्वतःकरता ठेवून घेऊ नकोस, घेशील तर त्यामुळे पाशात पडशील; कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे.


त्या लोकांशी तुम्ही अशा प्रकारे वागावे : त्यांच्या वेद्या पाडून टाका, त्यांचे स्तंभ फोडून टाका, त्यांच्या अशेरा मूर्ती तोडून टाका आणि त्यांच्या कोरीव मूर्ती अग्नीत जाळून टाका.


मग तुमची पापकृती म्हणजे तुम्ही केलेले वासरू घेऊन मी अग्नीत जाळले; नंतर त्याचे फोडून तुकडे केले व कुटून धुळीसारखे बारीक चूर्ण केले व डोंगरावरून वाहणार्‍या ओढ्यात फेकून दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan