Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 32:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग मोशे मागे फिरून आपल्या हाती साक्षपटाच्या त्या दोन पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला; त्या पाट्यांवर पुढच्या व मागच्या अशा दोन्ही बाजूंना लिहिले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मग मोशे पर्वतावरून साक्षपटाच्या दोन पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला. त्या पाट्यावर पुढे व मागे अशा दोन्ही बाजूंना लिहिलेले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 मग मोशे आपल्या हातात कराराच्या नियमाच्या दोन पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला. त्या पाट्यांवर दोन्ही बाजूंनी, मागे व पुढे लेख कोरलेले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 32:15
14 Iomraidhean Croise  

परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते; परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो.


परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे ते जतन करावे म्हणून साक्षपटासमोर अहरोनाने ठेवले.


मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पर्वत चढून माझ्याकडे ये व येथे राहा; मी तुला दगडी पाट्या आणि लोकांच्या शिक्षणाकरता मी लिहिलेले नियम व आज्ञा देतो.”


मोशे मेघात प्रवेश करून पर्वतावर चढला; मोशे पर्वतावर चाळीस दिवस व चाळीस रात्री होता.


परमेश्वराने मोशेबरोबर सीनाय पर्वतावर हे सर्व भाषण केल्यावर आपल्या बोटाने लिहिलेले पाषाणाचे दोन साक्षपट त्याला दिले.


ह्या पाट्या देवाने केलेल्या होत्या आणि त्यांच्यावर खोदलेला लेख देवाने लिहिलेला होता.


मग मोशे सीनाय पर्वतावरून उतरला; आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या हातात घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहर्‍यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्याला भान नव्हते.


त्याने साक्षपट घेऊन कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले;


शाईने नव्हे, तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यांवर नव्हे तर ‘मांसमय अंत:करणरूपी पाट्यांवर’ ‘कोरलेले’, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र, असे तुम्ही प्रसिद्ध आहात.


जिचा लेख दगडांवर कोरलेला असून जिचे पर्यवसान मृत्यूत होत असे ती सेवा एवढी तेजस्वी होती की ‘मोशेच्या चेहर्‍याचे तेज’ नाहीसे होत चालले असूनही इस्राएल लोकांना जर त्याच्या चेहर्‍याकडे टक लावून पाहवेना,


ही वचने परमेश्वराने त्या पर्वतावर अग्नी, मेघ व निबिड अंधकार ह्यांमधून तुमच्या सर्व मंडळीला मोठ्या आवाजात सांगितली; अधिक सांगितली नाहीत. त्याने दोन दगडी पाट्यांवर ती लिहून माझ्या हाती दिली.


तेव्हा मी मागे फिरून पर्वतावरून उतरत असताना पर्वत अग्नीने जळत होता आणि कराराच्या दोन पाट्या माझ्या दोन्ही हातांत होत्या.


त्यात सोन्याचे धुपाटणे व सोन्याने चहूबाजूंनी मढवलेला कराराचा कोश होता; ह्या कोशात मान्ना ठेवलेले सुवर्णपात्र, कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या होत्या;


‘जो राजासनावर बसलेला होता’ त्याच्या उजव्या हातात ‘पाठपोट लिहिलेली’ व सात शिक्के ‘मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी’ मी पाहिली;


Lean sinn:

Sanasan


Sanasan