Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 32:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर ह्याची काकळूत करून म्हणाला, “हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने व भुजबलाने मिसर देशातून बाहेर आणलेस, त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 परंतु काकुळतीने विनंती करून मोशे आपला देव परमेश्वर ह्याला म्हणाला, हे परमेश्वरा, तुझ्या महान सामर्थ्याने व भुजप्रतापाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 पण याहवेह त्याचे परमेश्वर यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून विनंती करत मोशे म्हणाला, “याहवेह, तुमचे लोक ज्यांना तुम्ही महान सामर्थ्याने आणि बलवान हाताने इजिप्तमधून बाहेर आणले, त्यांच्याविरुद्ध तुमचा राग का पेटावा?

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 32:11
23 Iomraidhean Croise  

अब्राहाम म्हणाला, “पाहा, मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचे मी धाडस करत आहे;


कारण, ज्यांना तू मिसर देशातून, लोखंडाच्या भट्टीतून काढले तेच हे तुझे लोक, तुझे वतन होत;


पाहा, हे तुझे सेवक व तुझे लोक आहेत, त्यांना तू आपल्या महासामर्थ्याने व प्रबल हस्ताने सोडवले आहेस.


तेव्हा तो म्हणाला, ह्यांचा नायनाट केला पाहिजे; पण त्याचा क्रोध शांत करावा, व त्याने त्यांचा नाश करू नये, म्हणून त्याचा निवडलेला मोशे त्याला आडवा आला.


तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “चल, खाली उतर, कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिसर देशातून आणले ते बिघडले आहेत;


म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘मी परमेश्वर आहे; मी तुम्हांला मिसरी लोकांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हांला मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन;


मग फारोने मोशे व अहरोन ह्यांना बोलावून आणून म्हटले, “परमेश्वराला विनवणी करा की, माझ्यापासून आणि माझ्या प्रजेपासून त्याने हे बेडूक दूर करावेत, म्हणजे परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करण्यासाठी मी तुमच्या लोकांना जाऊ देईन.”


हे परमेश्वरा, आम्हांला तुझ्या ह्या मार्गातून का बहकू देतोस? आम्ही तुझे भय बाळगू नये इतकी आमची मने कठोर का करतोस? तुझे सेवक, तुझे वतन झालेले वंश ह्याच्याकरिता परत ये.


मग परमेश्वर मला म्हणाला, “मोशे व शमुवेल हे माझ्यापुढे उभे राहिले तरी माझे अंतःकरण ह्या लोकांकडे वळायचे नाही; त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालव, त्यांना निघून जाऊ दे.


हे परमेश्वरा, पाहा, हे तू कोणाला केले ह्याचा विचार कर! स्त्रियांनी आपल्या पोटचे फळ, हातावर खेळवलेली आपली बालके खावीत काय? याजक व संदेष्टा ह्यांना प्रभूच्या पवित्रस्थानात जिवे मारावे काय?


तथापि माझ्या नामासाठी, ज्या राष्ट्रांमध्ये ते राहत होते त्यांच्यादेखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा, म्हणून मी हे कार्य केले; मी त्यांना मिसर देशातून काढून त्या राष्ट्रांच्यादेखत त्यांना प्रकट झालो.


आता हे प्रभो, आमच्या देवा, तू आपल्या सामर्थ्यवान हाताने मिसर देशातून आपल्या लोकांना बाहेर आणले व आजच्याप्रमाणे आपला महिमा वाढवला. आम्ही पाप केले आहे; आम्ही दुराचरण केले आहे.


देवडी व वेदी ह्यांच्यामध्ये याजक, परमेश्वराचे सेवक, रुदन करत म्हणोत, ‘हे परमेश्वरा, आपल्या लोकांवर करुणा कर; आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस; होऊ देशील तर राष्ट्रे त्याची निर्भर्त्सना करतील; ‘त्यांचा देव आता कोठे गेला’ असे राष्ट्रांनी का म्हणावे?”’


मोशे परमेश्वराला म्हणाला, “तू आपल्या दासाला दुःख का देत आहेस? तू ह्या सर्व लोकांचा भार माझ्यावर घालत आहेस, ह्यावरून माझ्यावर तुझी कृपादृष्टी नाही असे दिसते; असे का?


मोशे परमेश्वराला म्हणाला, “तू आपल्या सामर्थ्याने ह्या लोकांना मिसरी लोकांमधून आणले आहेस.


तेव्हा ते पालथे पडून म्हणाले, “हे देवा, सर्व देहधारी आत्म्यांच्या देवा, एका मनुष्याने पाप केले म्हणून सर्व मंडळीवर कोपायमान होतोस काय?”


हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, “परमेश्वराविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे; तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर.” तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली.


पण त्याला मुलगे नव्हते एवढ्यावरूनच आमच्या बापाचे नाव त्याच्या कुळातून का गाळावे? आम्हांलाही आमच्या बापाच्या भाऊबंदांबरोबर वतन द्या.”


“मी शौलाला राजा केले ह्याचा मला पस्तावा होत आहे; कारण मला अनुसरण्याचे सोडून देऊन त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.” ह्यावरून शमुवेलाला संताप आला व तो रात्रभर परमेश्वराचा धावा करत राहिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan