Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 30:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 त्यांचे अभिषेकाचे पवित्र तेल म्हणजे गांध्यांच्या कसबाप्रमाणे मिसळलेले सुगंधी तेल तयार कर; हे अभिषेकाचे पवित्र तेल होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 व त्याचे अभिषेकाचे पवित्र तेल म्हणजे गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळलेले अभिषेकासाठी पवित्र, सुंगधी तेल तयार कर;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 यातून पवित्र अभिषेकाचे तेल, सुगंधी द्रव्ये तयार करणार्‍याच्या कुशलतेप्रमाणे तयार करावे. ते पवित्र अभिषेकाचे तेल असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 30:25
18 Iomraidhean Croise  

तेव्हा सादोक याजकाने सभामंडपातील तेलाने भरलेले शिंग घेऊन शलमोनाला अभिषेक केला आणि कर्णा वाजवला; तेव्हा “शलमोन राजा चिरायू होवो” असा लोकांनी घोष केला.


याजकपुत्रांपैकी काही जण गांध्यांचे काम करीत.


ते मस्तकावर ओतलेल्या, अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या, त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे;


माझा सेवक दावीद मला मिळाला आहे; मी आपल्या पवित्र तेलाने त्याला अभिषेक केला आहे.


तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्याबरोबर त्याच्या मुलांना ही वस्त्रे चढवून त्यांना अभिषेक करावा. त्यांच्यावर संस्कार करावा, आणि त्यांना पवित्र करावे म्हणजे ते याजक ह्या नात्याने माझी सेवा करतील.


वेदीवरील रक्त आणि अभिषेकाचे तेल ह्यांतले थोडे घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्त्रांवर, तसेच त्याच्याबरोबर त्याच्या मुलांवर व त्यांच्या वस्त्रांवरही शिंपडावे; अशाने तो व त्याची वस्त्रे आणि त्याच्याबरोबर त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे पवित्र होतील.


नंतर अभिषेकाचे तेल त्याच्या डोक्यावर ओतून त्याला अभिषेक कर.


पाचशे शेकेल तज, आणि एक हिनभर जैतुनाचे तेल हे सर्व घेऊन,


हे तेल कोणाही व्यक्तीच्या अंगाला लावायचे नाही व ह्या प्रकारचे मिश्रण कोणी करायचे नाही; हे पवित्र आहे; आणि तुम्ही ह्याला पवित्रच लेखावे.


आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून निर्भेळ शुद्ध आणि पवित्र असे धूपद्रव्य तयार करावेस;


धूपवेदी, तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी द्रव्ययुक्त धूप, व निवासमंडपाच्या दारासाठी पडदा;


त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांधी बनवतात तसा बनवला.


अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला आणि त्यातल्या सगळ्या वस्तूंना अभिषेक करून मंडप व त्याचे सर्व सामान पवित्र कर, म्हणजे तो पवित्र होईल.


गंध्याच्या तेलास, मरून पडलेल्या माश्यांमुळे दुर्गंधी येते व ते नासून जाते, तसा अल्पमात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा ह्यांवर बसतो.


मग मोशेने अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला व त्यात असलेल्या सगळ्या वस्तूंना अभिषेक करून पवित्र केले.


“तू अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे ह्यांना आणि त्यांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोर्‍हा, दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली ही घेऊन


मग मनुष्यवध करणार्‍या त्या मनुष्याला, रक्तपाताबद्दल सूड घेणार्‍याच्या हातून सोडवून ज्या शरणपुरात तो पळून गेला होता तेथे त्याला मंडळीने पुन्हा पोचते करावे; आणि पवित्र तेलाने अभिषेक केलेला मुख्य याजक मरेपर्यंत त्या मनुष्याने तेथेच राहावे.


तुला न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan