Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 30:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 “तू उत्तम प्रकारचे मसाले घे, म्हणजे पवित्रस्थानातल्या चलनाप्रमाणे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस, त्याच्या निम्मे म्हणजे अडीचशे शेकेल सुगंधी दालचिनी, अडीचशे शेकेल सुगंधी बच,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 “तू उत्तम प्रकारचे मसाले घे; म्हणजे पवित्र स्थानातल्या चलनाप्रमाणे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस; त्याच्या निम्मे म्हणजे अडीचशे शेकेल सुगंधी दालचिनी, पाचशे शेकेल सुगंधी बच,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 “पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार हे उत्तम मसाले घे: पाचशे शेकेल गंधरस, त्याच्या अर्धे म्हणजे दोनशे पन्नास शेकेल सुगंधी दालचिनी, दोनशे पन्नास शेकेल सुगंधी वेखंड,

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 30:23
20 Iomraidhean Croise  

तेव्हा सादोक याजकाने सभामंडपातील तेलाने भरलेले शिंग घेऊन शलमोनाला अभिषेक केला आणि कर्णा वाजवला; तेव्हा “शलमोन राजा चिरायू होवो” असा लोकांनी घोष केला.


त्यांच्यापैकी काही जणांकडे सामान-सुमान, पवित्रस्थानातील सर्व पात्रे, सपीठ, द्राक्षारस, तेल, ऊद व सुगंधी द्रव्ये ह्यांची व्यवस्था असे.


याजकपुत्रांपैकी काही जण गांध्यांचे काम करीत.


तुझ्या सर्व वस्त्रांना बोळ, ऊद व दालचिनी ह्यांचा सुगंध येत आहे; हस्तिदंती राजमंदिरातील तंतुवाद्ये तुला आनंदित करतात.


दिव्यांसाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धूपासाठी मसाले;


मग परमेश्वर मोशेला म्हणाला,


पाचशे शेकेल तज, आणि एक हिनभर जैतुनाचे तेल हे सर्व घेऊन,


अभिषेकाचे तेल व पवित्रस्थानासाठी सुगंधी द्रव्ययुक्त धूप ह्या सर्व गोष्टींविषयी मी तुला आज्ञा दिली आहे त्याप्रमाणे त्यांनी करावे.” कराराची खूण म्हणून पाळायचा शब्बाथ दिवस


आणि दिव्यासाठी व अभिषेकासाठी तेल व सुगंधी धूपासाठी मसाला आणला.


त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांधी बनवतात तसा बनवला.


मी आपली गादी बोळ, अगरू व दालचिनी, ह्यांनी सुवासिक केली आहे.


माझा वल्लभ माझ्या कुचद्वयामध्ये ठेवलेल्या गंधरसाच्या पुडीसारखा मला आहे.


तुझ्या सुवासिक अत्तराचा घमघमाट सुटतो; तुझे नाव सिंचन केलेले सुगंधी अत्तरच होय; म्हणूनच कुमारी तुझ्यावर प्रेम करतात.


मेंदी व जटामांसी, जटामांसी व केशर, वेखंड व दालचिनी, उदाची सर्व प्रकारची झाडे, आणि गंधरस व अगरू, तशीच इतर सर्व सुगंधी झाडे तुझ्या ठायी आहेत.


तू पैसे देऊन माझ्यासाठी अगरू विकत घेतला नाहीस, आपल्या यज्ञबलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाहीस; तर तू आपल्या पातकांची माझ्यावर सक्ती केलीस, तू आपल्या दुष्कर्मांनी मला शिणवलेस.


शबाहून ऊद व दूर देशाहून अगरू माझ्याकडे आणण्याचे काय प्रयोजन? तुमच्या होमबलींनी मला संतोष नाही, तुमचे यज्ञबली मला पसंत नाहीत.


ददान व यावान हे तुझा माल घेऊन तुला सूत देत; पोलाद, तज व अगरू ही तुझ्या व्यापाराच्या मालापैकी असत.


शबा व रामा येथील व्यापारी तुझ्याबरोबर व्यापार करीत; ते तुझा माल घेऊन तुला हरतर्‍हेचे उंची मसाले, जवाहीर व सोने देत.


अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याला जी कामगिरी सोपवून द्यायची ती ही : दिव्याचे तेल, सुगंधी धूप, निरंतरचे अन्नार्पण, अभिषेकाचे तेल, निवासमंडप व त्यातील सर्व सामान म्हणजे पवित्रस्थान व त्यातील उपकरणे ह्यांची निगा त्याने ठेवावी.”


मग शमुवेलाने तेलाची कुपी घेऊन शौलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, “परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना?


Lean sinn:

Sanasan


Sanasan