Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 30:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 इस्राएल लोकांपासून प्रायश्‍चित्ताचा पैसा घेऊन दर्शनमंडपातील सेवेला लावावा आणि हा पैसा इस्राएल लोकांच्या जिवाबद्दल प्रायश्‍चित्त दिल्याचे स्मारक म्हणून त्यांच्याप्रीत्यर्थ परमेश्वरासमोर राहील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 इस्राएल लोकांकडून प्रायश्चित्ताचा पैसा घ्यावा आणि त्याचा दर्शनमंडपामधील सेवेसाठी उपयोग करावा; हा पैसा इस्राएल लोकांच्या जिवाबद्दल प्रायश्चित्त दिल्याचे स्मारक म्हणून त्यांच्याप्रीत्यर्थ परमेश्वरासमोर राहील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 इस्राएली लोकांकडून प्रायश्चिताचा पैसा घेऊन तो सभामंडपाच्या सेवेकरिता लावावा. तुमच्या जिवासाठी केलेले प्रायश्चित इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून राहील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 30:16
9 Iomraidhean Croise  

राजाने त्यांचा नायक यहोयादा ह्याला बोलावून विचारले, “आज्ञापटाच्या तंबूसाठी परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएलाची मंडळी ह्यांनी वहिवाट लावून दिल्याप्रमाणे यहूदा आणि यरुशलेम ह्यांतल्या लोकांपासून लेव्यांना कर जमा करण्यास का सांगितले नाही?”


हा दिवस तुम्हांला स्मारकादाखल होईल. ह्या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरवून सण पाळावा; पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा.


तुम्ही आपल्या जिवाबद्दल प्रायश्‍चित्त म्हणून परमेश्वरा-प्रीत्यर्थ हे समर्पण कराल तेव्हा श्रीमंताने अर्ध्या शेकेलाहून अधिक देऊ नये आणि गरिबाने त्याहून कमी देऊ नये.


मग परमेश्वर मोशेला म्हणाला,


ह्याचा हेतू असा की, अहरोन वंशाचा नसलेल्या कोणा परक्याने परमेश्वरासमोर धूप जाळण्यास जाऊ नये ह्याचे स्मरण इस्राएल लोकांना राहावे; आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे एलाजाराला सांगितल्याप्रमाणे कोरहाची व त्याच्या साथीदारांची झाली तशी गत कोणाचीही होऊ नये.


मोशे व एलाजार याजक ह्यांनी हे सोने सहस्रपती व शतपती ह्यांच्यापासून घेऊन इस्राएल लोकांच्या प्रीत्यर्थ परमेश्वरासमोर स्मारक म्हणून दर्शनमंडपात नेऊन ठेवले.


मग त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे; ते तुमच्यासाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan