Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 30:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 जितक्या लोकांची मोजदाद होईल तितक्यांनी पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे अर्धा शेकेल द्यावा (शेकेल म्हणजे वीस गेरे); हा अर्धा शेकेल परमेश्वराप्रीत्यर्थ केलेले समर्पण होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 जितक्या लोकांची मोजदाद होईल तितक्यांनी पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे अर्धा शेकेल द्यावा. हा अर्धा शेकेल परमेश्वराकरता केलेले समर्पण आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 प्रत्येकजण ज्यांची मोजणी होईल, त्यांनी पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार अर्धा शेकेल द्यावा, ज्याचे मोल वीस गेरे आहे. हा अर्धा शेकेल याहवेहसाठी अर्पण आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 30:13
17 Iomraidhean Croise  

“स्वामी माझे ऐका : ही अवघी चारशे शेकेल रुपे किंमतीची जमीन, तिचे काय मोठे? आपण आपल्या मयतास मूठमाती द्या.”


यहोआशाने याजकाला सांगितले की, ‘समर्पण केलेला जेवढा पैसा परमेश्वराच्या मंदिरी येतो, म्हणजे गणती करताना प्रत्येक माणसाकडून घेतलेला पैसा, प्रत्येक मनुष्याचे नवसाच्या संबंधाने याजक मोल ठरवील तो पैसा आणि लोक परमेश्वराच्या मंदिरात खुशीने आणत तो सर्व पैसा,


याजकांनी आपल्या ओळखीच्या लोकांपासून घ्यावा आणि मंदिरात जी काय मोडतोड झाली असेल तिची दुरुस्ती करावी.”


वीस वर्षांच्या व त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये ज्यांची गणना होईल त्यांतील प्रत्येकाने परमेश्वराप्रीत्यर्थ हे समर्पण करावे.


पवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी लागलेले सोने, म्हणजे लोकांनी अर्पण केलेले सगळे सोने एकोणतीस किक्कार1 होते, आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ते सातशे तीस शेकेल होते.


म्हणजे जितके वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची गणती झाली तेव्हा, ते सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास भरले. त्यांतल्या प्रत्येकामागे पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलना-प्रमाणे एकेक बेका म्हणजे अर्धा शेकेल मिळाला.


शेकेल2 वीस गेरांचा2 असावा आणि माने2 वीस शेकेलांचा, पंचवीस शेकेलांचा किंवा पंधरा शेकेलांचा असावा.


ज्याचे मोल तू ठरवशील ते पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ठरवावे; शेकेल म्हणजे वीस गेरा.


पुरुष वीस वर्षांपासून साठ वर्षांच्या आतील असला तर पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे त्याचे मोल पन्नास शेकेल रुपे असावे,


“कोणी परमेश्वराच्या कोणत्याही पवित्र वस्तूंच्या बाबतीत अज्ञानाने विश्वासघात केल्याने पापी ठरला, तर त्याने परमेश्वराला दोषार्पण करण्यासाठी कळपातील एक दोषहीन मेंढा घेऊन यावे; तू ठरवशील तितक्या चांदीच्या शेकेलांचा तो असावा; हे शेकेल पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे असावेत; हे दोषार्पण होय.


ज्यांना खंड घेऊन सोडायचे ते एक महिन्याचे झाले म्हणजे त्यांच्याबद्दल ठरवलेले मोल पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे पाच शेकेल रुपे म्हणजे वीस गेरा घेऊन त्यांना सोडून द्यावे;


प्रत्येक पुरुषामागे पाच-पाच शेकेल घ्यावेत. पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ते घ्यावेत; शेकेल म्हणजे वीस गेरा.


त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;


धूपाने भरलेली सोन्याची बारा धूपपात्रे पवित्रस्थानाच्या शेकेलाच्या चलनाप्रमाणे प्रत्येकी दहा शेकेल वजनाची होती; सर्व धूपपात्रांचे सोने एकशे वीस शेकेल होते;


नंतर ते कफर्णहूमात आल्यावर मंदिरपट्टीचा रुपया वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचा गुरू मंदिराच्या पट्टीचा रुपया देत नाही काय?”


नंतर येशू देवाच्या मंदिरात गेला आणि मंदिरात जे क्रयविक्रय करत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालवून दिले, सराफांचे चौरंग व कबुतरे विकणार्‍यांच्या बैठका पालथ्या केल्या.


ह्यावरून आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुऊन म्हटले, “मी ह्या [नीतिमान] मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पाहा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan