Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 परमेश्वर म्हणाला, “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे, त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 परमेश्वर म्हणाला, “मिसरामध्ये माझ्या लोकांचा जाच मी खरोखर पाहिला आहे; आणि मुकादमांच्या त्रासामुळे त्यांनी केलेला आकांत मी ऐकला आहे; त्यांचे दु:ख मी जाणून आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 नंतर याहवेहने त्याला सांगितले, “इजिप्त देशातील माझ्या लोकांचे हाल मी बघितले आहे. त्यांच्या मुकादमांच्या त्रासामुळे त्यांचे रडणे मी ऐकले आहे आणि त्यांच्या दुःखाविषयी मला चिंता आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 3:7
31 Iomraidhean Croise  

परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, “पाहा, तू गर्भवती आहेस, तुला मुलगा होईल, त्याचे नाव इश्माएल ठेव; कारण परमेश्वराने तुझा आक्रोश ऐकला आहे.


म्हणून त्यांच्याविषयीची जी ओरड माझ्या कानी आली आहे तशीच त्यांची करणी आहे की काय हे पाहायला मी खाली जातो; तसे नसेल तर मला कळून येईल.”


देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारेला म्हटले, “हागारे, तू कष्टी का? भिऊ नकोस, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे.


लेआ गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याचे नाव तिने ‘रऊबेन’ ठेवले; ती म्हणाली, “परमेश्वराने माझ्या दु:खाकडे पाहिले आहे, कारण आता माझा नवरा माझ्यावर प्रीती करील.”


तो म्हणाला, “आपली दृष्टी वर करून पाहा; मेंढ्यांवर उडणारे सर्व एडके बांडे, ठिपकेदार व करडे आहेत; लाबान तुझ्याशी कसा वागत आहे हे मी पाहिले आहे.


माझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव आणि इसहाकाचा ‘धाक’ (देव) माझा पाठीराखा नसता तर आताही आपण मला रिकामे लावून दिले असते. माझे दु:ख व माझ्या हातांनी केलेले कष्ट देवाने पाहून काल रात्री आपल्याला धमकावले.”


दीन जनांस तू तारतोस, उन्मत्त जनांवर दृष्टी ठेवून त्यांचा अध:पात करतोस.


यहोआहाजाने परमेश्वराला विनवणी केली ती त्याने ऐकली; अरामाचा राजा इस्राएलास कसा गांजत होता हे परमेश्वराने पाहिले होते.


“परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिज्कीया ह्याला सांग, तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; मी तुला बरे करतो. तू आजपासून तिसर्‍या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील.


नंतर तू मिसर देशात आमच्या पूर्वजांचे कष्ट पाहिले व तांबड्या समुद्राच्या तीरी त्यांचा धावा ऐकला;


तथापि त्यांची आरोळी ऐकून परमेश्वराने त्यांच्या संकटाकडे दृष्टी लावली;


परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत; भट्टीत सात वेळा शुद्ध करून जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुप्यासारखी ती आहेत.


माझ्या ठायी माझा आत्मा व्याकूळ झाला आहे; तरी माझा मार्ग तुला ठाऊक आहे; मी जातो त्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पाश मांडला आहे.


तो आपले भय धरणार्‍यांची इच्छा पुरवतो; व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारतो.


कारण त्याने पीडिताची दैन्यावस्था तुच्छ लेखली नाही व तिचा वीट मानला नाही. त्याने आपले मुख त्याच्या दृष्टिआड केले नाही; तर पीडिताने धावा केला तेव्हा त्याने तो ऐकला.


मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला; त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले.


ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला, आणि त्याच्या सर्व संकटांतून त्याला सोडवले.


हे परमेश्वरा, तूही पाहिले आहेस, उगा राहू नकोस; हे प्रभू, माझ्यापासून दूर राहू नकोस.


मग मी तुझी सारी कीर्ती वर्णीन; तू केलेल्या उद्धाराबद्दल मी सीयोनकन्येच्या द्वारांसमोर हर्ष करीन.


त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यांना जेरीस आणावे, ह्या हेतूने त्यांच्यापासून बिगारकाम करून घेणारे मुकादम नेमले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठारांची नगरे बांधली;


पुढे योसेफाची ज्याला माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिसर देशावर आला.


तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे गांजले आणि त्यांनी माझ्याकडे गार्‍हाणे केले, तर मी त्यांचे गार्‍हाणे अवश्य ऐकेन;


आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास, तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. हे राष्ट्र तुझी प्रजा आहे हे लक्षात घे.”


मग लोकांचे मुकादम व नायक बाहेर जाऊन त्यांना म्हणाले, “फारो म्हणतो, मी तुम्हांला गवत पुरवणार नाही.


त्याच दिवशी फारोने त्या लोकांचे मुकादम व त्यांचे नायक ह्यांना आज्ञा केली की,


त्यांच्या सर्व दु:खाने तो दु:खी झाला, त्याची प्रत्यक्षता दर्शवणार्‍या दिव्यदूताने त्यांचे तारण केले; त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने त्यांना उद्धरले; पूर्वीचे सर्व दिवस त्याने त्यांचे लालनपालन केले.


पण आम्ही परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने आमचे ऐकले आणि दूत पाठवून आम्हांला मिसर देशातून बाहेर काढून आणले; आम्ही हल्ली तुझ्या सीमेवरील कादेश नगरात आलो आहोत;


मिसर देशातल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे, त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे; तर आता चल, मी तुला मिसर देशात पाठवतो.’


कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.


“उद्या ह्या सुमारास मी तुझ्याकडे बन्यामिनी प्रांतातला एक मनुष्य पाठवीन, त्याला अभिषेक करून माझ्या इस्राएल लोकांवर अधिपती नेम; तो माझ्या लोकांना पलिष्ट्यांच्या हातून सोडवील; कारण माझ्या लोकांचे गार्‍हाणे माझ्याकडे आले आहे म्हणून त्यांच्याकडे माझी नजर गेली आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan