Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 3:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ते पाहण्यास मोशे तिकडे वळला असे परमेश्वराने पाहिले, आणि झुडपातून देवाने त्याला हाक मारून म्हटले, “मोशे, मोशे.” तेव्हा तो म्हणाला, “काय आज्ञा?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मोशे झुडूपाजवळ येत आहे हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, “मोशे! मोशे!” आणि मोशे म्हणाला, “हा मी इथे आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मोशे ते झुडूप पाहण्यासाठी गेला हे याहवेहने पाहिले, तेव्हा परमेश्वराने त्याला झुडूपातून आवाज दिला, “मोशे, मोशे!” मोशे म्हणाला, “हा मी येथे आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 3:4
18 Iomraidhean Croise  

ह्या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहामाला कसोटीस लावले; त्याने ‘अब्राहामा’, अशी हाक मारली, तेव्हा अब्राहाम म्हणाला, “काय आज्ञा?”


तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, “अब्राहामा! अब्राहामा!” तो म्हणाला, “काय आज्ञा?”


मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, “खरोखर ह्या ठिकाणी परमेश्वर आहे, पण हे मला कळले नव्हते.”


तेव्हा रात्री दृष्टान्तात देव इस्राएलाशी बोलला, “याकोबा, याकोबा.” तो म्हणाला, “काय आज्ञा?”


एकदा देव बोलला आहे; मी दोनदा हे ऐकले आहे की, सामर्थ्य देवाचे आहे.


तेव्हा मोशे देवाकडे वर गेला; आणि परमेश्वराने त्याला पर्वतातून हाक मारून सांगितले की, “याकोबाच्या घराण्याला हे सांग, इस्राएल लोकांना हे विदित कर.


तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्याला दर्शन दिले; त्याने दृष्टी लावली तर झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले.


मोशे परमेश्वराला म्हणाला, “पाहा, तू मला म्हणतोस की, ‘ह्या लोकांना घेऊन जा’; पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठवणार हे मला अजून कळवले नाहीस. तरी तू म्हटले आहेस की, ‘मी तुला व्यक्तिश: नावाने ओळखतो, आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे.’


“ह्यावरून ते विश्वास धरतील की त्यांच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर ह्याचे तुला दर्शन झाले आहे.”


परमेश्वराने दर्शनमंडपातून मोशेला हाक मारून म्हटले,


मग त्याने अशी वाणी ऐकली की, ‘पेत्रा, ऊठ; मारून खा.’


त्याने दिवसाच्या सुमारे तिसर्‍या प्रहरी दृष्टान्तात असे स्पष्टपणे पाहिले की, आपणाकडे देवाचा दूत येत असून “कर्नेल्या,” अशी आपणास हाक मारत आहे.


तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, “शौला, शौला, माझा छळ का करतोस?”


आणि पृथ्वी व तिच्या भांडारातील अमूल्य वस्तू ह्यांचा आशीर्वाद, आणि जो झुडपात राहत होता त्याची प्रसन्नता, योसेफाच्या मस्तकावर येवो; जो आपल्या भाऊबंदांत प्रमुख होता, त्याच्या मस्तकावर हे सर्व येवो.


तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला, आणि पहिल्याप्रमाणे “शमुवेला, शमुवेला” अशी त्याने हाक मारली, तेव्हा शमुवेल म्हणाला, “बोल, तुझा दास ऐकत आहे.”


तेव्हा परमेश्वराने शमुवेलास हाक मारली; तो म्हणाला, “काय आज्ञा?”


पुन्हा परमेश्वराने “शमुवेला, शमुवेला,” अशी हाक मारली, तेव्हा शमुवेल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, “काय आज्ञा? मला तुम्ही हाक मारली!” तो म्हणाला, “मुला, मी तुला हाक मारली नाही; परत जाऊन नीज.”


परमेश्वराने शमुवेलास तिसर्‍यांदा हाक मारली, तेव्हा तो उठून एलीकडे गेला आणि म्हणाला, “काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारलीत?” परमेश्वर त्या बालकाला हाक मारत आहे असे एली आता समजला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan