Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 3:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तर तुमची प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणीपासून व आपल्या घरात बिर्‍हाड करून राहणार्‍या स्त्रीपासून सोन्या-रुप्याचे अलंकार व पोशाख मागून घेईल; ते तुम्ही आपल्या मुलामुलींना घालाल; ह्या प्रकारे तुम्ही मिसरी लोकांना लुटाल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तर प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणीकडून व आपल्या घरात राहणाऱ्या स्त्रीकडून भेटवस्तू मागून घेईल व ते लोक तिला भेटवस्तू देतील; ते तुम्हा लोकांस सोन्यारुप्याचे दागिने व कपडे भेट म्हणून देतील. तुम्ही ते आपल्या मुलांच्या व मुलींच्या अंगावर घालाल. अशा प्रकारे तुम्ही मिसराच्या लोकांस लुटाल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 इजिप्त देशातील स्त्रियांकडून व तुमच्या शेजारणीकडून प्रत्येक इस्राएली स्त्रीने सोन्याचे व चांदीचे दागिने व उत्तमोत्तम वस्त्रे मागून घ्यावीत व तुम्ही ते आपल्या मुलांवर व मुलींवर चढवावे, याप्रकारे तुम्ही इजिप्त देशातील लोकांना लुटाल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 3:22
9 Iomraidhean Croise  

मग ज्या राष्ट्राचे दास्य ते करतील त्याचे मी पारिपत्य करीन, त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तेथून निघतील.


मग त्या सेवकाने सोन्यारुप्याचे दागिने व वस्त्रे काढून रिबकेला दिली आणि तिचा भाऊ व तिची आई ह्यांना बहुमोल वस्तू दिल्या.


त्याने लोकांना सोन्यारुप्यासहित बाहेर नेले; त्याच्या लोकांच्या वंशात कोणी दुर्बल नव्हता.


तू लोकांना सांगून ठेव की, प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजार्‍यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्याचांदीचे दागिने मागून घ्यावेत.”


चांगला मनुष्य आपल्या पुत्रपौत्रांना वतन ठेवतो, पण पाप्यांचे धन नीतिमानासाठी साठवलेले असते.


अरे लुटार्‍या, तुला लुटले नाही; अरे ठका, तुला ठकवले नाही; तुला धिक्कार असो! तुझे लुटणे आटपले म्हणजे तुला लुटतील; तुझे ठकवणे आटपले म्हणजे तुला ठकवतील.


ते रानातून लाकडे आणणार नाहीत, जंगलांतले लाकूड तोडणार नाहीत; तर ही शस्त्रे ते जाळतील; त्यांना ज्यांनी लुटले त्यांना ते लुटतील व त्यांना ज्यांनी नागवले त्यांना ते नागवतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan