Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 3:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तुझे सांगणे ते ऐकतील; मग तू आणि इस्राएलाचे वडील जन मिसर देशाच्या राजाकडे जा व त्याला सांगा, इब्र्यांचा देव परमेश्वर आम्हांला भेटला आहे; तर आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करावा, म्हणून आम्हांला तीन दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 ते तुझे ऐकतील, मग तू व इस्राएलाचे वडीलजन मिळून तुम्ही मिसराच्या राजाकडे जा व त्यास सांगा, इब्री लोकांचा देव परमेश्वर आम्हांला भेटला आहे. आमचा देव परमेश्वर याच्यासाठी यज्ञ करण्यासाठी म्हणून आम्हांला तीन दिवसाच्या वाटेवर रानात जाऊ दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 “इस्राएलचे वडीलजन तुझा शब्द मानतील. मग तू आणि वडीलजन इजिप्तच्या राजाकडे जाऊन त्याला सांगा, याहवेह, इब्रींचे परमेश्वर, यांनी आम्हाला दर्शन देऊन सांगितले आहे की आम्ही तीन दिवसांच्या प्रवासाच्या अंतरावर रानात जाऊन याहवेह आमचे परमेश्वर यास यज्ञ अर्पण करावा म्हणून तू आम्हाला जाऊ दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 3:18
40 Iomraidhean Croise  

परमेश्वराने अब्रामाला सांगितले, “तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा;


तेथून पळून आलेल्या एका मनुष्याने जाऊन अब्राम इब्री ह्याला हे वर्तमान सांगितले, त्या वेळी तो अष्कोल व आनेर ह्यांचा भाऊ अमोरी मम्रे ह्याच्या एलोन राईत राहत होता; हे अब्रामाच्या जुटीतले होते.


ह्या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टान्तात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे : “अब्रामा, भिऊ नको. मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल.”


अब्राम नव्व्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्त्विकपणे राहा.


याकोब योसेफाला म्हणाला, “सर्वसमर्थ देवाने कनान देशातल्या लूज येथे मला दर्शन देऊन आशीर्वाद दिला;


आणि यहूदाला देवाचा असा वरदहस्त प्राप्त झाला की राजाने व सरदारांनी परमेश्वराच्या वचनानुसार जी आज्ञा केली ती पाळण्यास ते एकचित्ताने तत्पर झाले.


तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात, पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहिवरासारखे आहेत.


मग मोशे आणि अहरोन फारोकडे आत जाऊन त्याला म्हणाले, “इब्री लोकांचा देव परमेश्वर असे म्हणतो, ‘तू माझ्यासमोर नमायला कोठवर नाकारशील? माझ्या लोकांना माझी सेवा करायला जाऊ दे.


परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू लोकांच्या पुढे जा, इस्राएलांतील काही वडील माणसे बरोबर घे आणि जी आपली काठी तू नील नदीवर आपटलीस ती हाती घेऊन चाल.


इस्राएल लोकांना मिसर देशातून निघून तीन महिने झाले त्याच दिवशी ते सीनायच्या रानात येऊन पोहचले.


तेथे तुला मी भेटत जाईन; आणि इस्राएल लोकांसाठी ज्या काही गोष्टीसंबंधाने मी तुला आज्ञा देणार आहे, त्या सर्वांविषयी मी दयासनावरून त्या साक्षपटाच्या कोशावरील दोन्ही करूबांमधून तुझ्याशी बोलत जाईन.


देव म्हणाला, “खचीत मी तुझ्याबरोबर असेन; मी तुला पाठवले ह्याची खूण हीच : तू लोकांना मिसरातून काढून आणल्यावर ह्याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल.”


तू जा आणि इस्राएलाच्या वडील जनांस जमवून सांग; तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला दर्शन देऊन म्हटले की, माझे तुमच्यावर खरोखर लक्ष गेले आहे व मिसर देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे;


त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे आणि ते थोडेसे घेऊन दर्शनमंडपातील ज्या कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन त्यात ठेवावे; ते तुम्ही परमपवित्र लेखावे.


साक्षपटाच्या कोशाजवळ असलेल्या अंतरपटासमोर, अर्थात साक्षपटावरील ज्या दयासनी मी तुला भेट देत जाईन त्यासमोर ही वेदी ठेवावी.


तेव्हा मोशेने उत्तर दिले, “पण ते माझा विश्वास धरणार नाहीत. माझे म्हणणे ऐकणार नाहीत; ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही.”


मी तुला सांगितले की, “माझ्या पुत्राला माझी सेवा करण्यास जाऊ दे”; पण तू त्याला जाऊ देण्याचे नाकारले, तर पाहा, मी तुझा पुत्र, तुझा ज्येष्ठ पुत्र जिवे मारीन.”’


मग मोशे प्रवास करीत असता उतारशाळेत असे झाले की परमेश्वराने त्याला गाठून जिवे मारायला पाहिले.


तेव्हा लोकांना विश्वास वाटला; परमेश्वराने इस्राएलवंशजांची भेट घेऊन त्यांची विपत्ती पाहिली हे त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी नमन करून त्याची आराधना केली.


नंतर मोशे व अहरोन फारोकडे जाऊन म्हणाले, “इस्राएलाचा देव परमेश्वर सांगत आहे की, माझ्या लोकांनी माझ्याप्रीत्यर्थ रानात उत्सव1 करावा म्हणून त्यांना जाऊ द्यावे.”


ते म्हणाले, “इब्र्यांच्या देवाने आम्हांला भेट दिली; तर आता आम्हांला तीन दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे आणि आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करू द्यावा; असे न केल्यास तो कदाचित पटकीने अथवा तलवारीने आमचा समाचार घेईल.”


त्याला असे सांग की, ‘इब्री लोकांचा देव परमेश्वर ह्याने माझ्या हाती तुला हा निरोप सांगितला आहे की, माझ्या लोकांना जाऊ दे म्हणजे ते रानात माझी सेवा करतील; पण पाहा, तू अजून ऐकत नाहीस.’


नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोकडे जाऊन त्याला सांग, ‘परमेश्वर असे म्हणतो की, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ द्यावे.


नंतर परमेश्वराने मोशेला सांगितले की, “पहाटेस ऊठ आणि जाऊन फारोपुढे उभा राहा; तो त्या वेळी नदीवर येईल; तू त्याला सांग, ‘परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून तू त्यांना जाऊ दे.’


माझ्या प्रजेमध्ये व तुझ्या प्रजेमध्ये मी भेद राखीन; उद्यापर्यंत हे चिन्ह घडेल.”’


मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोकडे जाऊन सांग, ‘इब्र्यांचा देव परमेश्वर असे सांगतो की, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ द्यावे.


परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहाटेस उठून फारोपुढे उभा राहा, आणि त्याला सांग, ‘इब्र्यांचा देव परमेश्वर असे म्हणतो की, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ द्यावे.


जो आवडीने नीती आचरतो त्याला, जे तुझ्या मार्गाने चालताना तुझे स्मरण करतात, त्यांना तू भेट देतोस; पाहा, तू आमच्यावर कोपलास, कारण आम्ही पापी ठरलो; ह्या स्थितीत आम्ही बहुत काळ आहोत; तर आमचा उद्धार होईल काय?


“जा, हे पुकारून यरुशलेमेच्या कानी पाड : परमेश्वर असे म्हणतो की, तुझे तारुण्यातले प्रेम, वाङ्निश्‍चयाच्या वेळचा तुझा अनुराग व रानात पडीत स्थळी तुझे माझ्यामागून येणे ह्यांचे मला स्मरण आहे.


ते असेही म्हणाले नाहीत की, ‘ज्या परमेश्वराने आम्हांला मिसर देशातून आणले, आम्हांला रानातून वैराण व खाच-खळग्यांच्या प्रदेशातून, निर्जल देशातून व मृत्युच्छायेतून नेले, ज्या प्रदेशातून कोणी जातयेत नाही व जेथे मनुष्यवस्ती नाही त्यातून आम्हांला नेले, तो परमेश्वर कोठे आहे?’


माझे सेवक जे संदेष्टे त्यांना मी मोठ्या निकडीने तुमच्याकडे पाठवले असता त्यांचे तुम्ही ऐकले नाही, त्यांची वचने आता तुम्ही ऐकणार नाही;


आणि दर्शनमंडपातील साक्षपटासमोर जेथे मी तुम्हांला दर्शन देत असतो तेथे त्या काठ्या ठेव.


जसे आम्ही सर्व बाबतीत मोशेचे ऐकत होतो तसेच आम्ही तुझेही ऐकू; मात्र तुझा देव परमेश्वर मोशेबरोबर होता तसाच तुझ्याबरोबर असो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan