Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 3:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तू जा आणि इस्राएलाच्या वडील जनांस जमवून सांग; तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला दर्शन देऊन म्हटले की, माझे तुमच्यावर खरोखर लक्ष गेले आहे व मिसर देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तू जाऊन इस्राएलाच्या वडीलजनांना एकत्रित करून त्यांना सांग की, तुमच्या पूर्वजांचा देव म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा देव परमेश्वर, याने मला दर्शन देऊन म्हटले की, तुम्हांकडे खरोखर माझे लक्ष गेले आहे व मिसर देशात तुम्हांसोबत काय घडले आहे हे मला कळले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 “जा आणि इस्राएलांच्या सर्व वडीलजनांना एकत्र बोलव आणि त्यांना सांग, तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांचे परमेश्वर याहवेह हे मला प्रकट झाले आणि म्हणाले, मी तुमच्याकडे लक्ष दिले आहे आणि इजिप्तमध्ये तुमच्याबाबतीत जे काही घडत आहे ते मी पाहिले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 3:16
31 Iomraidhean Croise  

असे देवाने अंतराळ केले आणि अंतराळाखालच्या व वरच्या जलांना वेगळे केले; आणि तसे झाले.


ह्यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले.


आणि पाहा, परमेश्वर तिच्या वरती उभा राहून त्याला म्हणाला, “मी परमेश्वर तुझा पिता अब्राहाम ह्याचा देव व इसहाकाचा देव आहे; ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन;


त्याने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या देवासन्मुख माझे वडील अब्राहाम व इसहाक चालले, माझ्या जन्मापासून आजवर ज्या देवाने माझे पालन केले,


नंतर योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी आता मरणार; देव खरोखर तुमची भेट घेईल. जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना त्याने शपथपूर्वक देऊ केला आहे त्यात तुम्हांला ह्या देशातून घेऊन जाईल.”


ह्यासाठी की त्यांनी सीयोनेत परमेश्वराच्या नावाची घोषणा करावी, व यरुशलेमात त्याची स्तुती गावी;


पाहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात,


मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी? मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे?


पुढे योसेफाची ज्याला माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिसर देशावर आला.


मोशेने आपल्याबरोबर योसेफाच्या अस्थी घेतल्या, कारण योसेफाने इस्राएल लोकांकडून शपथ वाहवून त्यांना सांगितले होते की, देव खात्रीने तुम्हांला भेट देईल तेव्हा तुम्ही आपल्याबरोबर माझ्या अस्थी घेऊन जा.


हे ऐकून राष्ट्रे कंपायमान झाली आहेत; पलेशेथवासी भयभीत झाले आहेत.


परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू लोकांच्या पुढे जा, इस्राएलांतील काही वडील माणसे बरोबर घे आणि जी आपली काठी तू नील नदीवर आपटलीस ती हाती घेऊन चाल.


मग मोशेचा सासरा इथ्रो ह्याने देवाला होमबली अर्पण केले व यज्ञ केले; आणि अहरोन इस्राएलांच्या सर्व वडिलांसह मोशेचा सासरा इथ्रो ह्याच्याबरोबर देवासमोर भोजन करायला आला.


म्हणून देवाने इस्राएलवंशजांकडे दृष्टी लावली; देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरवले.


पण इस्राएल लोकांच्या सरदारांवर त्याने हात उगारला नाही; त्यांना देवाचे दर्शन झाले आणि त्यांनी खाणेपिणे केले. सीनाय पर्वतावर मोशे


तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्याला दर्शन दिले; त्याने दृष्टी लावली तर झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले.


तो आणखी म्हणाला, “मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले तोंड झाकले; कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला.


तेव्हा मोशेने उत्तर दिले, “पण ते माझा विश्वास धरणार नाहीत. माझे म्हणणे ऐकणार नाहीत; ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही.”


नंतर मोशे व अहरोन ह्यांनी जाऊन इस्राएलवंशाचे सर्व वडील जन जमवले;


तेव्हा लोकांना विश्वास वाटला; परमेश्वराने इस्राएलवंशजांची भेट घेऊन त्यांची विपत्ती पाहिली हे त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी नमन करून त्याची आराधना केली.


“ह्यावरून ते विश्वास धरतील की त्यांच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर ह्याचे तुला दर्शन झाले आहे.”


तेव्हा कयफा नावाच्या प्रमुख याजकाच्या वाड्यात मुख्य याजक [व शास्त्री] आणि लोकांचा वडीलवर्ग जमला;


“इस्राएलाचा देव प्रभू धन्यवादित असो, कारण त्याने ‘आपल्या लोकांची’ भेट घेऊन त्यांची ‘खंडणी भरून सुटका’ केली आहे;


तुला व ‘तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील’ आणि तुझ्यामध्ये चिर्‍यावर चिरा राहू देणार नाहीत; कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस.”


त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे ते बर्णबा व शौल ह्यांच्या हाती वडीलवर्गाकडे1 पाठवून दिले.


परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरता काही लोक काढून घ्यावेत म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली, हे शिमोनाने सांगितले आहे; आणि ह्याच्याशी संदेष्ट्यांच्या उक्तींचाही मेळ बसतो. असा शास्त्रलेख आहे की,


मग त्याने मिलेताहून इफिसास निरोप पाठवून मंडळीच्या वडिलांना बोलावून घेतले.


परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून ‘समाचाराच्या दिवशी’ देवाचा गौरव करावा.


तुमच्यातील वडिलांना, जो मी सोबतीचा वडील,1 ख्रिस्ताच्या दु:खांचा साक्षी व प्रकट होणार्‍या गौरवाचा वाटेकरी तो मी असा बोध करतो :


परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यांना अन्न दिले आहे असे वर्तमान तिला मवाब देशात कळले, तेव्हा त्या देशातून आपल्या दोन्ही सुनांसह परत जाण्यास ती निघाली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan