Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 3:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 आणखी देवाने मोशेला सांगितले, “तू इस्राएल लोकांना सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे; हेच माझे सनातन नाव आहे व ह्याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 देव मोशेला असे म्हणाला, “तू इस्राएल लोकांस सांग, तुमच्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हांकडे पाठवले आहे. हेच माझे सर्वकाळचे नाव आहे, व हेच माझे स्मारक सर्व पिढ्यांना होईल;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 परमेश्वर मोशेला आणखी म्हणाले, “इस्राएलास सांग, ‘अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर या तुमच्या पूर्वजांचा परमेश्वर याहवेहने मला तुमच्याकडे पाठविले आहे.’ “हेच माझे सनातन नाव आहे, आणि सर्व पिढ्यांपर्यंत याच नावाने तुम्ही मला हाक मारणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 3:15
41 Iomraidhean Croise  

आणि तो म्हणाला, “हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम ह्याच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर; माझा धनी अब्राहाम ह्याच्यावर दया कर.


हा करार त्याने अब्राहामाशी केला आणि त्याविषयी इसहाकाशी शपथ वाहिली,


हे परमेश्वरा, आमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांच्या देवा, तुझ्या प्रजाजनांच्या हृदयाच्या ठायी हे विचार व ह्या कल्पना निरंतर वागतील व त्यांची मने तुझ्याकडे नेहमी लागतील असे कर.


पण ओदेद नावाचा परमेश्वराचा एक संदेष्टा तेथे होता; शोमरोनास सैन्य परत आले तेव्हा त्याला मार्गात गाठून तो म्हणाला, “पाहा, तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर हा यहूदावर रागावला म्हणून त्याने त्याला तुमच्या हाती दिले; तुम्ही इतक्या क्रोधाने त्यांची कत्तल केली की तो गगनापर्यंत पोहचला आहे.


हे परमेश्वरा, तू सर्वकाळ राजासनारूढ आहेस; तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या कायम राहील.


तू उठून सीयोनेवर दया करशील; कारण तिच्यावर कृपा करण्याचा समय आला आहे. नेमलेला समय येऊन ठेपला आहे;


हे परमेश्वरा, तुझे नाव चिरकाल राहील; हे परमेश्वरा, तुझे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील.


अहो परमेश्वराचे भक्तहो, त्याचे गुणगान गा; आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण करताना त्याचा धन्यवाद करा.


त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो; त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो; रात्री विलापाने बिर्‍हाड केले तरी प्रात:काळी हर्षध्वनी होतो.


पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे.


त्याचे नाव सर्वकाळ राहो; सूर्य आहे तोवर त्याचे नाव वृद्धिंगत होवो; त्याच्या नावाने लोक आपणांस धन्य म्हणोत; सर्व राष्ट्रे त्याचा धन्यवाद करोत.


त्याचे गौरवयुक्त नाव सदा सुवंदित असो; त्याच्या महिम्याने सर्व पृथ्वी भरो. आमेन! आमेन!


परमेश (याह) माझे बल, माझा स्तोत्रविषय आहे, तो माझा उद्धारक झाला आहे; हाच माझा देव, स्तवनाने मी ह्याला सुशोभित करीन; हाच माझ्या पित्याचा देव मी ह्याचा महिमा गाईन.


परमेश्वर रणवीर आहे; याव्हे हे त्याचे नाव.


तेव्हा मोशे देवाला म्हणाला, “पाहा, ‘मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुमच्याकडे पाठवले आहे,’ असे मी इस्राएलवंशजांकडे जाऊन त्यांना सांगितले असता ‘त्याचे नाव काय’ असे मला ते विचारतील, तेव्हा मी त्यांना काय सांगू?”


तो आणखी म्हणाला, “मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले तोंड झाकले; कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला.


तेव्हा मोशेने उत्तर दिले, “पण ते माझा विश्वास धरणार नाहीत. माझे म्हणणे ऐकणार नाहीत; ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही.”


“ह्यावरून ते विश्वास धरतील की त्यांच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर ह्याचे तुला दर्शन झाले आहे.”


देव मोशेशी बोलला; तो म्हणाला, “मी परमेश्वर आहे.


परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे, त्यात नीतिमान धावत जाऊन निर्भय राहतो.


हे परमेश्वरा, तुझ्या न्यायमार्गात राहून तुझी आम्ही प्रतीक्षा करीत आहोत; तुझ्या नामाची व तुझ्या स्मरणाची उत्कंठा आमच्या जिवास लागून राहिली आहे.


मी परमेश्वर आहे; हे माझे नाम आहे; मी आपले गौरव दुसर्‍यास देऊ देणार नाही; मी आपली प्रशंसा मूर्तींना प्राप्त होऊ देणार नाही.


ज्याने आपला प्रतापी भुज मोशेच्या उजव्या बाजूने चालवला, आपले नाम सर्वकाळ राहावे म्हणून ज्याने त्यांच्यापुढे समुद्र दुभागला,


कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील.


“हे करणारा परमेश्वर, हे घडवून स्थापणारा परमेश्वर, परमेश्वर हे नाम धारण करणारा तुला म्हणतो की,


हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे उपकार मानतो व तुझे स्तवन करतो की तू मला ज्ञान व बल ही दिली आहेत आणि ज्यासाठी आम्ही तुला विनवले ते तू मला आता कळवले आहेस; तू आम्हांला राजाची गोष्ट कळवली आहेस.”


परमेश्वर, सेनाधीश देव परमेश्वर, हे नाम त्याचे स्मारक आहे :


“म्हणून तू आपल्या देवाकडे वळ; दया व न्याय ह्यांचे पालन कर; आपल्या देवाची प्रतीक्षा करून राहा.”


तो इस्राएल स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नावाची निंदा करून शिव्याशाप देऊ लागला तेव्हा त्याला मोशेकडे आणले. त्याच्या आईचे नाव शलोमीथ असे असून ती दान वंशातील दिब्री ह्याची मुलगी होती.


सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत; पण आम्ही परमेश्वर आमचा देव ह्याच्या नावाने सदासर्वकाळ चालू.


कारण मी परमेश्वर आहे, मी बदलणारा नाही; म्हणून याकोबवंशजहो, तुम्ही नष्ट झाला नाहीत.


ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे.’ तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे.”


अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, ह्याने आपला ‘सेवक’ येशू, ह्याचा गौरव केला आहे; त्याला तुम्ही धरले व पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्‍चय केला असताही त्याच्यासमक्ष तुम्ही त्याला नाकारले.


‘मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव आहे.’ तेव्हा मोशे थरथर कापला व त्याला तिकडे पाहण्याचे धैर्य झाले नाही.


तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर, तुम्ही आता आहात त्यापेक्षा सहस्रपट तुम्हांला वाढवो, आणि आपल्या वचनाप्रमाणे तो तुम्हांला आशीर्वाद देवो.


‘जो उत्तम देश तुमच्या पूर्वजांना देण्याचे मी शपथपूर्वक वचन दिले होते, तो देश ह्या दुष्ट पिढीतील माणसांपैकी एकाच्याही दृष्टीस पडणार नाही;


आता, अहो इस्राएल लोकहो, जे विधी व नियम मी तुम्हांला शिकवत आहे ते पाळावेत म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हांला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्याल.


पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात; ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणवून घ्यायला देवाला त्यांची लाज वाटत नाही; कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे.


येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan