Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तर आता चल, तू मिसर देशातून माझे लोक इस्राएलवंशज ह्यांना बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तर आता, माझ्या इस्राएली लोकांस मिसर देशामधून बाहेर काढण्यासाठी मी तुला फारोकडे पाठवत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तर आता जा, माझ्या इस्राएलच्या लोकांना इजिप्तमधून बाहेर काढून आणावे म्हणून मी तुला फारोहकडे पाठवित आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 3:10
20 Iomraidhean Croise  

परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू निश्‍चितपणे समज की जो देश स्वत:चा नाही, अशा देशात तुझे संतान उपरे होऊन राहील व तेथील लोकांचे दास्य करील, आणि ते लोक चारशे वर्षे त्यांना छळतील.


मग ज्या राष्ट्राचे दास्य ते करतील त्याचे मी पारिपत्य करीन, त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तेथून निघतील.


त्याने आपला सेवक मोशे व आपण निवडलेला अहरोन ह्यांना पाठवले.


मोशे व अहरोन ह्यांच्या हस्ते तू आपले लोक कळपांप्रमाणे नेले.


इस्राएल लोकांना मिसर देशात राहून चारशे तीस वर्षे लोटली होती.


चारशे तीस वर्षे संपली त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून निघाल्या.


मोशे परमेश्वराला म्हणाला, “पाहा, तू मला म्हणतोस की, ‘ह्या लोकांना घेऊन जा’; पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठवणार हे मला अजून कळवले नाहीस. तरी तू म्हटले आहेस की, ‘मी तुला व्यक्तिश: नावाने ओळखतो, आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे.’


आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास, तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. हे राष्ट्र तुझी प्रजा आहे हे लक्षात घे.”


इस्राएल लोकांच्या सेना करून त्यांना मिसर देशातून बाहेर घेऊन जा असे परमेश्वराने ज्यांना सांगितले तेच हे अहरोन व मोशे.


एका संदेष्ट्याच्या हस्ते परमेश्वराने इस्राएलास मिसर देशातून बाहेर आणले, दुसर्‍या संदेष्ट्याच्या हस्ते त्याचे रक्षण करवले.


मी तर तुला मिसर देशातून बाहेर आणले, दास्यगृहातून तुला सोडवून घेतले; मी तुझ्यापुढे मोशे, अहरोन व मिर्याम ह्यांना पाठवले.


मिसर देशातल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे, त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे; तर आता चल, मी तुला मिसर देशात पाठवतो.’


‘त्याने मिसर देशात’, तांबड्या समुद्रात व ‘रानात चाळीस वर्षे अद्भुत कृत्ये करून व चिन्हे दाखवून’ त्या लोकांना बाहेर नेले.


देवाने आणखी असे सांगितले की, ‘त्याची संतती परदेशात जाऊन उपरी होईल आणि ते लोक त्यांना दास करून चारशे वर्षे जाचतील.


ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्याचे पारिपत्य मी करीन,’ असे देवाने सांगितले; आणि ‘त्यानंतर ते तेथून निघून माझी सेवा ह्या स्थळी करतील.’


तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, “तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्राएलाला मिद्यानाच्या हातून सोडव; मी तुला पाठवले आहे ना?”


शमुवेल लोकांना म्हणाला, “ज्याने मोशे व अहरोन ह्यांना नेमले व तुमच्या वाडवडिलांना मिसर देशातून आणले तो परमेश्वरच होय.


याकोब मिसरात गेला आणि तुमच्या वाडवडिलांनी परमेश्वराचा धावा केला, तेव्हा परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना पाठवले व त्यांनी तुमच्या वाडवडिलांना मिसरातून काढून आणून ह्या स्थळी वसवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan