Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 29:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आणि अहरोनाला व त्याच्या मुलांना कमरबंद बांध. त्यांच्या डोक्यांना फेटे बांध; ह्या प्रकारे ह्या निरंतरच्या विधीने त्यांना याजकपद प्राप्त व्हावे. ह्या प्रकारे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यावर संस्कार करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आणि अहरोनाला व त्याच्या पुत्रांना कमरबंद बांध व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधावेत; अशा प्रकारे या विधीने त्यांचे याजकपद कायमचे राहील, ह्याप्रमाणे अहरोन व त्याची मुले ह्यांच्यावर संस्कार करावेत

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्यांना फेटे बांधावे. मग अहरोनास व त्याच्या पुत्रांना कमरपट्टे बांधावे. याप्रमाणे याजकत्व कायमचे त्यांचेच असणार. “मग तू अहरोन व त्याच्या मुलांना अभिषेक करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 29:9
22 Iomraidhean Croise  

साक्षपटासमोर असणार्‍या अंतरपटाबाहेर दर्शनमंडपात1 अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर उजळण्याची व्यवस्था ठेवावी; हा इस्राएल लोकांसाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.


तुझा भाऊ अहरोन ह्याने याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याला व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे नादाब, अबीहू, एलाजार व इथामार ह्यांना इस्राएल लोकांतून आपल्याजवळ आण.


कारण मोशे म्हणाला होता की, ‘आज आपल्याला परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पण करून प्रत्येक पुरुषाने आपल्या मुलावर किंवा भावावर चालून जावे, म्हणजे आज तो तुम्हांला वरदान देईल.’


त्यांच्या बापाला जसा अभिषेक करशील तसाच त्यांना कर, म्हणजे याजक ह्या नात्याने ते माझी सेवा करतील. हा त्यांचा अभिषेक त्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरच्या याजकपदाचा दर्शक होईल.”


परमेश्वर मोशेला म्हणाला,


मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणले, त्यांना अंगरखे घातले, कमरेला कमरबंद कसले आणि त्यांना फेटे बांधले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.


आणि तुमच्या समर्पणाचे सात दिवस पुरे होईपर्यंत तुम्ही दर्शनमंडपाच्या दाराबाहेर जाऊ नये, कारण तुमचे समर्पण सात दिवस चालेल.


तुला व तुझ्या सर्व लेवीय भाऊबंदांना परमेश्वराने आपल्याजवळ घेतले असले तरी याजकपदही तुम्ही मिळवू पाहता काय?


मग परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्या धूप जाळणार्‍या दोनशे पन्नास पुरुषांना भस्म केले.


ह्याचा हेतू असा की, अहरोन वंशाचा नसलेल्या कोणा परक्याने परमेश्वरासमोर धूप जाळण्यास जाऊ नये ह्याचे स्मरण इस्राएल लोकांना राहावे; आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे एलाजाराला सांगितल्याप्रमाणे कोरहाची व त्याच्या साथीदारांची झाली तशी गत कोणाचीही होऊ नये.


पण वेदीच्या संबंधात किंवा अंतरपटाच्या आतील सेवेच्या बाबतीत तू व तुझे मुलगे ह्यांनी आपले याजकपण सांभाळावे; तुम्ही सेवा करावी, कारण मी तुम्हांला दान म्हणून याजकपणाची ही सेवा दिली आहे; कोणी परका जवळ आला तर त्याला जिवे मारावे.”


त्याच्यासाठी व त्याच्यामागून त्याच्या संततीसाठी हा निरंतरचा याजकपदाचा करार होय; कारण आपल्या देवाविषयी तो ईर्ष्यावान होऊन त्याने इस्राएल लोकांसाठी प्रायश्‍चित्त केले.”


अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची नेमणूक कर म्हणजे ते आपले याजकपण सांभाळतील; कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे.”


कारण त्याने व त्याच्या वंशजांनी निरंतर परमेश्वराच्या नावाने सेवा करण्यास हजर राहावे म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने त्यांना तुझ्या सर्व वंशांतून निवडून घेतले आहे.


आणि त्याला ‘मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे’ प्रमुख याजक असे देवाकडून संबोधण्यात आले.


ह्या मीखाचे एक देवघर होते. त्याने एक एफोद आणि काही तेराफीम (कुलदेवतेची मूर्ती) तयार केल्या व आपल्या एका मुलाला दीक्षा देऊन आपला पुरोहित नेमले.


ह्यास्तव इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो; कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan