Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 28:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग दोन गोमेद रत्ने घेऊन त्यांवर इस्राएलांच्या मुलांची नावे त्यांच्या जन्माच्या क्रमाने कोरावीत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मग दोन गोमेद रत्ने घेऊन त्यांच्यावर इस्राएलाच्या पुत्रांची नावे त्यांच्या जन्माच्या क्रमाने कोरावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “दोन गोमेद रत्ने घेऊन त्यावर इस्राएलाच्या पुत्रांची नावे कोरून घ्यावीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 28:9
16 Iomraidhean Croise  

ह्या देशाचे सोने उत्तम असून येथे मोती व गोमेद सापडतात.


माझ्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ सोन्याच्या वस्तूंसाठी सोने, चांदींच्या वस्तूंसाठी चांदी, पितळेच्या वस्तूंसाठी पितळ, लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड व लाकडी वस्तूंसाठी लाकूड, गोमेदमणी, जडवण्यासाठी रत्ने, जडावाच्या कामासाठी रंगारंगांचे नग, हरतर्‍हेची रत्ने व संगमरवरी पाषाण ह्यांची रेलचेल मी आपले सगळे बळ खर्चून केली आहे.


तर माझा पिता दावीद ह्याने तरतूद करून ठेवल्याप्रमाणे यहूदात व यरुशलेमेत जे कारागीर आहेत त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी सोने, रुपे, पितळ व लोखंड ह्यांच्या कामात आणि जांभळे, किरमिजी व निळ्या रंगाचे कापड तयार करण्याच्या कामात निपुण आणि खोदीव काम जाणणारा असा एक कारागीर माझ्याकडे पाठवून द्या.


ओफीरचे सोने, गोमेद व नीलमणी ही भारंभार देऊनही त्याचे मोल होत नाही.


एफोद2 व ऊरपट ह्यांत जडवण्यासाठी गोमेद मणी आणि इतर रत्ने.


त्यांच्या नावांपैकी सहा नावे एका रत्नावर व बाकीची सहा नावे दुसर्‍या रत्नावर कोरावीत.


आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे; ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात जडवावीत.


शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी आणि जशी मुद्रा कोरतात तशी तिच्यावर ही अक्षरे कोरावीत : ‘परमेश्वरासाठी पवित्र’


एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड असावी; सोन्याच्या जरीची, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाची ती असावी.


जडवण्यासाठी रत्नांना पैलू पाडील, लाकडाचे नक्षीकाम करील; आणि अशी सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील.


आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे; ही रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणांत जडवली.


मुद्रेवर छाप कोरतात तशी त्यांनी गोमेद रत्नावर इस्राएलाच्या मुलांची नावे कोरली; ती रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणांत बसवली.


आपल्या हृदयाशी मला मुद्रेप्रमाणे ठेव, मुद्रेप्रमाणे मला आपल्या बाहूंवर ठेव; कारण प्रेम मृत्यूसारखे प्रबळ आहे; प्रेमसंशय अधोलोकासारखा निष्ठुर आहे; त्याची ज्वाला अग्निज्वालेसारखी, किंबहुना परमेशाने प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे.


पाहा, मी तुला आपल्या तळहातांवर कोरून ठेवले आहे; तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत.


देवाचा बाग एदेन ह्यात तू होतास; अलाक, पुष्कराज, हिरा, लसणा, गोमेद, यास्फे, नीलमणी, पाचू, माणिक, व सोने असे अनेक तर्‍हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते; खंजिर्‍या व बासर्‍या ह्यांचे कसब तुझ्या येथे चालत असे; तुला निर्माण केले त्या दिवशी त्यांची योजना झाली.


परमेश्वर त्यांचा देव आपल्या लोकांचा कळपासारखा त्या दिवशी बचाव करील; कारण ते त्याच्या देशात मुकुटावरील रत्नांप्रमाणे उंच स्थानी शोभतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan